News Flash

‘सुल्तान’मधील अभिनेता कुमुद मिश्रा यांना झाला करोना

कुमुद मिश्रा यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

राज्यात करोना संसर्ग अधिकच झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत असून, मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. अगदी सर्वसामान्य नागरिकांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वचजण करोनाच्या विळख्यात सापडत आहेत. आता बॉलिवूड अभिनेते कुमुद मिश्रा यांना करोना झाल्याचे समोर आले आहे. त्यांना मध्य प्रदेशातील रीवा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कुमुद यांना श्वासोच्छवासाचा त्रास सुरू झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या तीन दिवसांपासून कुमुद मिश्रा यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरुवातीला कुमुद यांच्या आईची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, आपल्या आईची काळजी घेत असताना कुमुद यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

कुमुद यांच्या आधी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना करोनाची लागण झाली होती. अक्षय कुमार, गोविंदा, आलिया भट्ट, आमिर खान, रणबीर कपूर यांना करोनाची लागण झाली होती.

कुमुद मिश्रा यांनी ‘रुस्तम’, ‘रिव्हॉल्वर राणी’, ‘जॉली एलएलबी 2’, ‘रांझणा’, ‘मुल्क’, ‘बदलापूर’, ‘थप्पड’, ‘एअरलिफ्ट’, ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’, ‘सुल्तान’ चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2021 12:30 pm

Web Title: actor kumud mishra tests positive for covid 19 and admitted in hospital dcp 98
Next Stories
1 ‘तुझा स्तनपानाचा व्हिडीओ शेअर करशील का?”; नेहा धुपियाने ‘तो’ फोटो शेअर करत दिलं उत्तर
2 ट्रोलर्सला उत्तर देताना फरहान अख्तर म्हणाला, ” घरीच राहा आणि तोंडं धुवा”
3 ट्विटरनंतर इन्स्टाग्रामवर कंगनाची टीका; ” जिहादींचा ताबा….पुढील निवडणुकीत भाजपला धोका”
Just Now!
X