05 December 2020

News Flash

कुणाल खेमूने काढून घेतला भन्नाट टॅटू, पाहा ३० तास घालवून काढलेल्या या टॅटूची खासियत

सध्या या टॅटूची जोरदार चर्चा आहे

(फोटो सौजन्य: कुणाल खेमूच्या इन्स्ताग्रामवरुन साभार)

अभिनेता कुणाल खेमूला टॅटूची खूप आवड आहे. त्याने आतापर्यंत अनेक टॅटू आपल्या शरीरावर काढून घेतले आहेत. त्याचे टॅटू प्रेम त्याच्याकडे पाहिल्यावर लगेच समजून येते. कुणालने पुन्हा एक भन्नाट टॅटू आपल्या पायावर काढून घेतल्याचा खुलासा केला आहे.

कुणालने त्याच्या इन्स्ताग्राम अकाउंटवरुन या टॅटूचा एक व्हिडीओ आणि फोटो शेअर केला आहे. या टॅटू कुणालच्या अनेक सेलिब्रिटी मित्रांना आणि त्याच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. व्हिडीओमध्ये कुणालच्या पायावर वाघाचा चेहरा असणारा टॅटू बनवण्यात आल्याचं दिसत आहे. हा टॅटू दिसायला अगदी भन्नाट आहे. या टॅटूचे वैशिष्ट्य म्हणजे तो एखाद्या थ्री डी पेटींगप्रमाणे आहे. तसेच हा टॅटू काढण्यासाठी ३० तासांचा वेळ लागला. हा टॅटू तसा जुनाच आहे मात्र त्याबद्दल आपण पहिल्यांचा पोस्ट करत असल्याची माहिती कुणाल खेमूनेच दिली आहे.

“अखेर हा टॅटू काढून पूर्ण झाला आहे. खरं तर हा टॅटू माझ्या पायावर २०१६ पासून आहे. मात्र मी त्याचे फोटो कशी शेअर केले नव्हते. ३० तासांच्या मेहनतीनंतर हा टॅटू पूर्ण झाला. या टॅटू काडण्यासाठी प्रत्येक सेशनमध्ये सहा तास लागले, मला हा टॅटू खूप आवडतो,” अशा कॅप्शनसहीत कुणालने हा व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kunal Kemmu (@khemster2) on

 

नुकताच कुणालने आपल्या मुलीच्या नावाचा टॅटू काढला. मुलीच्या वाढदिवसानिमित्त त्याने छातीवर इनाया हे नाव काढलं. हा फोटो शेअर करताना त्याने हा टॅटू खूप खास आहे कारण या टॅटूच्या माध्यमातून माझी मुलगी कायम माझ्यासोबत असेल असं म्हटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 10:34 am

Web Title: actor kunal khemu done a special tiger tattoo on his leg scsg 91
Next Stories
1 अभिनय बेर्डे-मयुरेश पेम देणार लक्ष्मीकांत बेर्डे व दादा कोंडके यांना मानवंदना
2 रामायणातील ‘सीता’ साकारतेय अफजल गुरूच्या पत्नीची भूमिका; पाहा ट्रेलर
3 जेव्हा भूमी पेडणेकरला फिल्म स्कूलमधून काढलं; फेडावं लागलं १३ लाख रुपयांचं कर्ज
Just Now!
X