देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. दररोज अनेकांना करोनाची लागण होत आहे. काही सेलिब्रिटींनाही करोनाची लागण झाली आहे. अभिनेता मोहित रैनालाही करोनाची लागण झाल्याची बातमी समोर येत आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मोहितने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत. यातल्या एका फोटोत तो रुग्णालयाच्या बाहेर उभा आहे, तर दुसऱ्या फोटोत त्याच्या हाताला सलाईन लावलेलं दिसत आहे. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, “मी जसं आत आणि बाहेर पाहतो तसं प्रार्थना करु लागतो. बाबा म्हणतात की प्रार्थनांचा उपयोग होतो. मी सर्वांना विनंती करतो की सुरक्षित राहा आणि माणुसकी म्हणून प्रार्थना करा”.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mohit Raina (@merainna)

तो पुढे म्हणतो, “गेल्या आठवड्यात माझा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यापासून मी स्वःतला डॉक्टरांच्या हवाली केलं आहे. आता मी सुरक्षित आहे. दररोज मी वेगवेगळ्या भावना पाहत आहे. या लोकांमुळेच आपण सुरक्षित आहोत. कमीत कमी आपण घरात राहू शकतोच. मी लवकरच तुम्हाला भेटेन”.

‘काफिर’ या वेबसीरीजमधली मोहितची सहकलाकार दिया मिर्झाने त्याच्या या पोस्टवर कमेंट केली आहे. दिया म्हणते, “खुश राहा आणि लवकर बरा हो. माझ्याकडून तुला खूप प्रेम आणि आशिर्वाद. लवकर बरा हो”.

आणखी वाचा- अरिजित सिंगचं भावनिक आवाहन….”एकही जीव या महामारीने जाता कामा नये….”

मोहित याआधी ‘मिसेस सिरीयल किलर’ या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. ‘भौकाल’ या वेबसीरीजमध्येही तो दिसला होता. ही वेबसीरीज पोलिसांच्या आयुष्यावर आधारित आहे. मोहितला ‘देवों के देव महादेव’ या मालिकेतून भरपूर प्रसिद्धी मिळाली होती. यात त्याने भगवान शंकरांची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. ‘उरी’ या चित्रपटातही तो दिसला होता.