News Flash

#TooMuchDemocracy, “वो बहुत जल्द मुर्दों से भी वोट डलवाएगा” म्हणतोय ‘हा’ अभिनेता!

व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल

‘इश्कबाज’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता नकुल मेहता सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. आणि त्याचं कारण आहे एक कविता. त्याने एक कविता सादर केली आहे. ही कविता अनेकांनी शेअर केली आहे आणि त्याचं कौतुकही केलं आहे. काय आहे ही कविता, जाणून घेऊया.

अभिनेता नकुल मेहताने कवी अजय सिंह यांची एक कविता सादर केली आहे. त्याचा व्हिडिओ नकुलने दोन दिवसांपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला होता. पण आता हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ही एक हिंदी कविता आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nakuul Mehta (@nakuulmehta)

नकुलने सादर केलेल्या या कवितेला त्याच्या चाहत्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. एक मिलियनहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. अनेकांनी शेअर केला असून अनेकांचं व्हॉटसप स्टेटसही आहे. अनेक कलाकारांनी त्याच्या पोस्टवर कमेंट करत त्याच्या सादरीकरणाचं आणि कवितेचं कौतुक केलं आहे. अभिनेत्री स्वरा भास्करनेही फायर इमोजी पोस्ट केले आहेत. तर अभिनेत्री दिया मिर्झा अभिनेता गौतम रोडे, शेफ रिपू हांडा यांनीही त्याच्या या व्हिडिओवर कमेंट केली आहे.

त्याच्या चाहत्यांनीही या कवितेतल्या विचारांना आपली सहमती दर्शवली आहे. एक युजर म्हणतो, “हे १०० टक्के खरं आहे पण लोकांना कळत नाही”. तर एक युजर म्हणतो, “तू मुसलमान असतास तर तुला पाकिस्तानात पाठवण्याची तयारी सुरु झाली असती”. एका युजरने कमेंट केली आहे की “२०२४च्या निवडणुकीपर्यंत हे शब्द लक्षात ठेवा. सत्य विसरुन जाऊ नका.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2021 12:22 pm

Web Title: actor nakul mehta shared a video of poem going viral vsk 98
Next Stories
1 ‘तारक मेहता…’मधील मराठमोळ्या अभिनेत्याने मुलाच्या उपचारासाठी मागितली मदत
2 “वडिलांचा वापर करुन सहानुभूती मिळवतोयस”,अशा मेसेजेसमुळे इरफान यांच्या मुलाने उचललं ‘हे’ पाऊल
3 बिकिनी फोटोशूटवर रश्मी देसाईने केला खुलासा; म्हणाली “असे कपडे तर…
Just Now!
X