24 September 2020

News Flash

अभिनेत्याच्या कुटुंबीयांना करोनाची लागण, सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती

अभिनेत्याची टेस्ट निगेटीव्ह आली आहे.

दिवसेंदिवस करोना विषाणूचे संक्रमण वाढत चालले असल्याचे दिसत आहे. अनेक कलाकारांना देखील करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले. आता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता नमिश तनेजाने त्याच्या कुटुंबीयांना करोनाची लागण झाल्याचे सांगितले आहे.

नुकताच नमिशने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने ‘तुम्ही सगळे कसे आहात? मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की माझे आई- वडिल, बहिण आणि चुलत भाऊ यांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. पण माझा करोना रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे आणि मी घरात आयसोलेशनमध्ये आहे. मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. कृपया तुम्ही देखील सुरक्षित रहा’ असे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे.

नमिश सध्या ‘विद्या’ या मालिकेत काम करत आहे. तसेच त्याने मै मायके चली जाऊंगी, इक्यावन, स्वारागिनी या मालिकांमध्ये काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 4:57 pm

Web Title: actor namish taneja family is corona positive avb 95
Next Stories
1 ‘दीदी पँट लूज है’ म्हणणाऱ्या ट्रोलरला अभिनेत्रीचे भन्नाट उत्तर
2 “सुशांतच्या नावाखाली कंगनाने स्वत:साठी Y+ सुरक्षा मिळवली”
3 अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ या तारखेला होणार प्रदर्शित
Just Now!
X