03 March 2021

News Flash

फोटोग्राफसाठी नवाजने घेतली ‘या’ व्यक्तीकडून प्रेरणा

या चित्रपटात नवाजने 'रफी' या फोटोग्राफरची भूमिका साकारली आहे

नवाजुद्दीन सिद्दीकी

दर्जेदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी. नवाजने आतापर्यंत काही निवड चित्रपटांची निवड केली असून त्याचे हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले गाजले आहेत. त्यामुळे अभिनयाच्या जोरावर त्याने त्याचा वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. सुरुवातीला लहान भूमिका साकारणारा हा अभिनेता आज बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता झाला आहे. नवाज लवकरच ‘फोटोग्राफ’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याने छायाचित्रकाराची भूमिका साकारली असून ही भूमिका वठविण्यासाठी त्याने एका खास व्यक्तीकडून प्रेरणा घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

रितेश बत्रा दिग्दर्शित ‘फोटोग्राफ’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटामध्ये नवाज आणि सान्य मल्होत्रा या दोघांची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. फोटोग्राफमध्ये नवाजने ‘रफी’ या फोटोग्राफरची भूमिका वठविली असून ही भूमिका साकारण्यासाठी त्याने एका खऱ्याखुऱ्या फोटोग्राफरकडून प्रेरणा घेतली आहे. विशेष म्हणजे फोटोग्राफर्सना ट्रिब्यूट देण्यासाठी या चित्रपटाचा एक विशेष शो चित्रपटाच्या टीमकडून आयोजित करण्यात आला होता.

दरम्यान, फोटोग्राफ हा चित्रपट धारावीमधील एका फोटोग्राफरच्या जीवनावर आधारित असून नवाजचा रितेश बत्रा यांच्यासोबतचा हा दुसरा चित्रपट आहे. तर सान्या पहिल्यांदाच नवाजसोबत पहिलाच चित्रपट आहे. सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचं वर्ल्ड प्रीमियर झाले असून बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्येदेखील हा चित्रपट दाखविण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2019 1:18 pm

Web Title: actor nawazuddin siddiqui took inspiration person
Next Stories
1 ‘सुपरवुमन’ लिली सिंग म्हणते, ‘बायसेक्शुअल असणे ही तर माझी सुपरपॉवर’
2 शाहरूखच्या भेटीची आमिरनं केली अक्षरश: माती
3 सलमान ठरला कॅमिओचा बादशहा; पाहुणा कलाकार असून गाजवले ‘हे’ १० चित्रपट
Just Now!
X