News Flash

बाहुबलीनं दत्तक घेतलं १६५० एकर जंगल

बाहुबली म्हणतोय, 'वनं वाचवा वनं वाढवा

(फोटो सौजन्य ट्विटर)

विकासाच्या नावाखाली गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर निसर्गाची झाली आहे. अनेक मोठमोठी जंगलं आता नष्ट होण्याच्या मार्गावर आली आहेत. अशा वातावरणात जंगलांच्या संरक्षणासाठी दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास पुढे सरसावला आहे. त्याने हैदराबादमधील काझिपल्ली येथील एक हजार ६५० एकर वनक्षेत्र दत्तक घेतलं आहे.

बाहुबली फेम प्रभासने काझिपल्ली वनाच्या सुरक्षतेची जबाबदारी स्विकारली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करुन याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली. “मी हैदराबादमधील काझीपल्ली येथील १६५० एकर वनक्षेत्र दत्तक घेतलं आहे. या वनाच्या विकासाची जबाबदारी मी स्विकारली आहे. चला तर मग आपण सर्वांनी मिळून भावी पिढीसाठी वनांचं संरक्षण करुया.” अशा आशयाचं वक्तव्य प्रभासने या व्हिडीओमध्ये केलं आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. या कार्यासाठी तमाम चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2020 11:52 am

Web Title: actor prabhas adopts 1650 acres of reserve forest mppg 94
Next Stories
1 काम करण्यास नकार देणाऱ्या सिनेमॅटोग्राफर पीसी श्रीराम यांना कंगनाचं उत्तर, म्हणाली…
2 Birthday Special : दुसऱ्या मुलासाठी ट्विंकलने अक्षयला घातली होती अट
3 ‘सुशांत जिवंत असता तर त्याला अटक केली असती का?’; तापसी पन्नूचा सवाल
Just Now!
X