News Flash

आर. माधवनच्या मुलाची कौतुकास्पद कामगिरी, देशाला मिळवून दिलं रौप्य पदक

वेदांत उत्तम स्विमर आहे

सध्या पाहायला गेलं तर बॉलिवूडमध्ये कलाकारांपेक्षा त्यांच्या मुलांचीच सर्वाधिक चर्चा आहे. या प्रत्येक स्टारकिडचा स्वतंत्र असा चाहतावर्गदेखील आहे. परंतु या सगळ्यापासून अभिनेता आर. माधवनचा मुलगा मात्र दूर आहे. वडील ग्लॅमरस दुनियेचा एक भाग असतानादेखील वेदांत या साऱ्या मोहजाळामध्ये अडकलेला नाही. विशेष म्हणजे स्टारडमपासून दूर असलेल्या वेदांतने ‘एशियन एज ग्रुप स्विमिंग चँपियनशिप’मध्ये रौप्य पदक जिंकत देशाच्या सन्मानात भर घातली आहे.

वेदांत हा उत्तम स्विमर असून त्याने नुकत्याच झालेल्या ‘एशियन एज ग्रुप स्विमिंग चँपियनशिप’मध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये त्याने 4×100 मीटर फ्रीस्‍टाइल रिलेमध्ये रौप्य पदक जिंकलं आहे. आर. माधवनने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली.

 

View this post on Instagram

 

India gets her Silver medal at the Asian Age Games . Gods grace .. Vedaants first official medal representing India .

A post shared by R. Madhavan (@actormaddy) on

‘भारताला ‘एशियन एज ग्रुप स्विमिंग चँपियनशिप’मध्ये रौप्य पदक मिळालं, देवाच्या कृपेमुळे वेदांतला मिळालेलं हे पहिलं अधिकृत मेडल आहे, असं म्हणत माधवनने ही पोस्ट शेअर केली.

दरम्यान, यापूर्वीही वेदांतने ‘थायलंड इंटरनॅशनल स्विम मीट’मध्ये कांस्य पदक जिंकलं होतं. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असून त्याने बॉलिवूडमध्येही काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याने ‘रहना है तेरे दिल में’, ‘रंग दे बसंती’, ‘तनु वेड्स मनु’, ‘3 इडियट्स’, या चित्रपटात काम केलं आहे. त्याचा आगामी चित्रपट इस्रोचे माजी वैज्ञानिक नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित ‘द नंबी इफेक्‍ट’ आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2019 8:55 am

Web Title: actor r madhavan son vedaant win silver medal in asian games swimming ssj 93
Next Stories
1 काळवीट शिकार प्रकरण : कोर्टात सुनावणीपूर्वी सलमान खानला जीवे मारण्याची धमकी
2 कॅप्टन कूल ‘धोनी’ बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण?
3 Video: बॉलिवूडच्या ‘देसी गर्ल’ने ‘धकधक गर्ल’सोबत घातला ‘पिंगा’
Just Now!
X