17 January 2021

News Flash

अभिनेते रणजीत चौधरी यांचे निधन

 हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री पर्ल पद्मसी या त्यांच्या आई होत.

संग्रहित छायाचित्र

 

आपल्या अभिनयाने रुपेरी पडदा गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते, लेखक  रणजीत चौधरी (वय ६४) यांचे बुधवारी मुंबईत निधन झाले.  हिंदी चित्रपटांबरोबरच हॉलिवूडमध्येही त्यांनी काम केले होते.

हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री पर्ल पद्मसी या त्यांच्या आई होत. पर्ल पद्मसी आणि रणजीत चौधरी ही मायलेकांची जोडी अनेकदा हिंदी चित्रपटांमधून एकत्र दिसली आहे.  बासू चॅटर्जी यांच्या ‘खट्टा मीठा’ चित्रपटातून त्यांनी अभिनयसृष्टीत पदार्पण केले होते. ऋषीकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘खूबसूरत’ या चित्रपटातील रणजीत यांनी साकारलेली जगन ही भूमिका चांगलीच लोकप्रिय झाली होती.  ‘मिसीसीपी मसाला’, ‘बातो बातो मे’,  ‘चक्र ’, ‘कालिया’, ‘कांटे’, ‘बँडिट क्वीन’, ‘फायर’, ‘कामसूत्र – अ टेल ऑफ लव्ह’ या चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या होत्या. हिंदी चित्रपटसृष्टीत काम केल्यावर १९८० मध्ये ते अमेरिके त स्थायिक झाले. ‘लास्ट हॉलिडे’, ‘लोनली ईन अमेरिका’, ‘केटल ऑफ फीश’, ‘होम अँड अ लिटील शुगर’, ‘ब्रेकवे’ या इंग्रजी चित्रपटातही त्यांनी भूमिका केल्या होत्या.

दिग्दर्शिका दीपा मेहता यांच्या ‘सॅम अँड मी’ या चित्रपटाचे पटकथा लेखनही त्यांनी के ले होते. छोटय़ा पडद्यावरील त्यांची ‘द ऑफिस’ ही मालिकाही  गाजली होती.  दिग्दर्शक संजय गुप्ता, राहुल ढोलकीया यांनी चौधरी यांना श्रध्दांजली वाहिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2020 1:07 am

Web Title: actor ranjit chaudhary dies abn 97
Next Stories
1 नर्गिस यांना वाटायचं संजय दत्त गे आहे; कारण
2 ‘त्यामुळे मला हिंदू देवींची भूमिका दिली गेली नाही’, नौसीन अलीचा खुलासा
3 सुबोध भावे विचारतोय, ‘काय स्टॉक संपला ना?’
Just Now!
X