News Flash

अभिनेते रणजित चौधरी कालवश

हॉलिवूड चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं होतं.

‘खट्टा मिठ्ठा’, ‘बातो बातो में’, ‘मिसिसिपी मसाला’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये लहानमोठ्या भूमिका साकारणारे अभिनेते रणजित चौधरी यांचे निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. ‘खुबसूरत’, ‘चक्र’, ‘कालिया’, ‘कांटे’, ‘बॅन्डिक्ट क्वीन’, ‘फायर’, ‘कामसूत्र- अ टेल ऑफ लव्ह’ या चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. अभिनेत्री पर्ल पदमसी यांचे ते पुत्र होते. रणजित चौधरी यांचे निधन कोणत्या कारणामुळे झाला याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

बॉलिवूडमध्ये काम केल्यानंतर ते अमेरिकेत स्थायिक झाले. तिथेही त्यांनी चित्रपटांमध्ये काम केलं होतं. ‘लास्ट हॉलिडे’, ‘लोनली इन अमेरिका’, ‘केटल ऑफ फिश’, ‘होप अँड अ लिटिल शुगर’, ‘ब्रेकवे’ या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. दीपा मेहता दिग्दर्शित ‘साम अॅण्ड मी’ या चित्रपटाची पटकथा त्यांनी लिहिली होती. त्यांचा ‘द ऑफिस’ हा टीव्ही शो लोकप्रिय झाला.

‘कांटे’ चित्रपटाचे दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली. ‘कांटे चित्रपटात तुझ्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता. ‘खट्टा मिठा’ हा माझा आवडता चित्रपट आहे. तुझ्या अभिनयातून प्रेक्षकांचं फार मनोरंजन झालं. तुझ्या आत्म्यास शांती मिळो’, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 10:47 am

Web Title: actor ranjit chowdhry passed away at the age of 64 ssv 92
Next Stories
1 “माझ्या पाकिटात कायम चार्ली चॅप्लिनचा फोटो असतो, कारण…”; अक्षय कुमारनेच दिली होती माहिती
2 ‘काही जोकर्समुळे पसरतोय करोना’; लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्यांवर भडकला सलमान
3 “बंदूक चालवू शकत नाही तर पोलिसांना दिली कशाला?”, कंगनाच्या बहिणीचं टीकास्त्र
Just Now!
X