News Flash

ऋषी कपूर उपचारासाठी अमेरिकेला रवाना

त्यांना नक्की कोणता आजार झाला आहे हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही.

ऋषी कपूर

आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे सतत चर्चेत राहणारे बॉलिवूडचे एव्हरग्रीन अभिनेता ऋषी कपूर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ऋषी कपूर यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपण उपचारासाठी अमेरिकेला रवाना होत असल्याचं म्हटलं आहे. मात्र त्यांना नक्की कोणता आजार झाला आहे हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही.

‘गेल्या ४५ वर्षांपेक्षा अधिक काळ मी बॉलिवूडमध्ये घालवला आहे. येथेच मला तुमचं प्रेम मिळालं. त्यामुळे माझ्याविषयीची माहिती माझ्या चाहत्यांना मिळावी ही माझी इच्छा. मी काही दिवस वैद्यकीय उपचारांसाठी अमेरिकेला रवाना होत आहे. तुमच्या शुभेच्छा माझ्यासोबत असतीलच त्यामुळे कोणतीही काळजी करु नका. मी लवकरच भारतात परत येईन’, असं ट्विट ऋषी कपूर यांनी केलं आहे.  ऋषी कपूर यांचं ट्विट वाचल्यानंतर त्यांचे चाहते बुचकळ्यात पडले आहेत. मात्र तरीदेखील त्यांनी ऋषी यांनी लवकर बर होण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, ऋषी कपूर यांची प्रकृती दीर्घकाळापासून खराब असून नुकतीचं त्यांनी आर. के. स्टुडिओतील गणपती विसर्जन मिरवणुकीत उपस्थिती दर्शविली होती. विशेष म्हणजे या वयातही ऋषी कपूर चित्रपटसृष्टीमध्ये सक्रिय असून काही महिन्यांपूर्वीच त्यांचे ‘१०२ नॉट आऊट’ आणि ‘मुल्क’ हे चित्रपट प्रदर्शित झाले. त्यानंतर लवकरच ते ‘राजमा चावल’ या चित्रपटातून प्रेक्षकांना भेटणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2018 12:04 pm

Web Title: actor rishi kapoor going to america for medical treatment
Next Stories
1 मच्छिंद्र कांबळी यांच्या ‘वस्त्रहरणा’विषयी या गोष्टी माहित आहेत का ?
2 नाना पाटेकरांवर केलेल्या आरोपाविषयी तनुश्रीची बहीण म्हणते…
3 Happy Birthday Shaan : जाणून घ्या, शानविषयी ‘या’ खास गोष्टी
Just Now!
X