News Flash

‘त्या’ व्यक्तीच्या व्हिडीओनं भारावला रितेश ; नेटकऱ्यांकडे मागितला फोन नंबर

हा व्हिडीओ तुम्हाला प्रेरणा देत नसेल तर मग काय?

‘त्या’ व्यक्तीच्या व्हिडीओनं भारावला रितेश ; नेटकऱ्यांकडे मागितला फोन नंबर

देशभरात रविवारी ७१वा प्रजासत्ताक दिन हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. राजपथापासून ते शहरं, गाव खेडी देशभक्तीच्या वातावरणानं न्हाऊन निघाली होती. प्रत्येकांनेच देशाविषयी असलेलं आपलं प्रेम वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त केलं. भारताविषयीचं प्रेम व्यक्त करणारा एक व्हिडीओ बघून अभिनेता रितेश देशमुख भारावून गेला. व्हिडीओ बघितल्यानंतर रितेश त्या व्यक्तीला सॅल्यूट केला. त्याचबरोबर त्याचा मोबाईल नंबरही मागितला.

एकापेक्षा एक हटके आणि गंमतीशीर व्हिडीओ टिक टॉकवर बघायला मिळतात. टिक टॉकवरील व्हिडीओ आणि टिक टॉक स्टारची चर्चा सातत्यानं सुरू असते. महत्त्वाचे म्हणजे १५ ऑगस्ट, २६ जानेवारी निमित्तानं देशभक्तीविषयीचे व्हिडीओ शेअर केले जातात. यावेळी साजऱ्या करण्यात आलेल्या प्रजासत्ताक दिनी एका व्हिडीओनं अनेकांच्या मनात घर केलं. हा व्हिडीओ बघून त्याविषयी बोलण्याचा मोह अभिनेता रितेश देशमुखलाही आवरला नाही. हा व्हिडीओ शेअर करत रितेश देशमुखनं या व्यक्तीला सॅल्यूट केला. “हा व्हिडीओ तुम्हाला प्रेरणा देत नसेल तर मग काय? असा प्रश्न रितेशनं विचारला आहे. या व्यक्तीला मी सॅल्यूट करतो. कुणाकडे त्याचा मोबाईल नंबर असेल, तर मला द्यावा,” असंही रितेशनं ट्विट करून म्हटलं आहे.

काय आहे व्हिडीओत?

या व्हिडीओत दोन्ही पाय नसेलला तरुण खांबावर चढत असल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे या खांबावर कोणताही झेंडा नाही. पण त्याच्या शरीरावर असणाऱ्या तिरंग्यामुळे तरुण तेव्हा खांबाच्या टोकाला पोहोचतो तेव्हा जणू काही तिरंगाच फडकत आहे असा भास होतो.

आनंद महिद्रांनीही केलं होत ट्विट –

हा व्हिडीओ बघून महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनीही ट्विट केलं होतं. “मी हा व्हिडओ कालच पोस्ट केला असता, पण आज सकाळी मला तो मिळाला. पण असं प्रेरणा देणारं, स्वत:बद्दल सारखं वाईट वाटून घेणं थांबवणारं तसंच मोठी इच्छा असेल तर मोठ्या गोष्टी करण्याची प्रेरणा देणारं असं काहीतरी पाहण्यासाठी कधीच उशीर झालेला नसतो”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2020 11:46 am

Web Title: actor ritesh deshmukh became emotional after watching that video bmh 90
Next Stories
1 अभिनयाच्या वेडापायी सरकारी नोकरीवर सोडलं पाणी!
2 अश्लील व्हिडीओ बघण्यासाठी बळजबरी; गणेश आचार्यविरोधात पोलिसांत तक्रार
3 ब्रेकअप झाल्यानंतर कमल हासनच्या लेकीला लागलं होतं ‘हे’ व्यसन