News Flash

‘छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नसून तो एक विश्वास आहे’

अभिनेता रितेश देशमुख यानं शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत

‘छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नसून हा एक विश्वास आहे. हा एक विचार आहे. हा विचार प्रत्येक मराठी माणसामध्ये जगलाच पाहिजे.’ असं म्हणत अभिनेता रितेश देशमुख यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहे. महाराजांप्रती आदर व्यक्त करत रितेशनं त्यांचं मनमोहक रुप कॅनव्हॉसवर साकारलं आहे.

‘जाणता राजा’ छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती देशभरात साजरी होत आहे. या लाडक्या राजांना रितेशनं चित्ररुपी मानवंदना वाहिली आहे. ‘जगभरातल्या शीवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नसून हा एक विश्वास आहे. हा एक विचार आहे. हा विचार प्रत्येक मराठी माणसामध्ये जगलाच पाहिजे. जय हिंद.. जय महाराष्ट्र..’ असं म्हणत रितेशनं शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रिशेतनं इन्स्टाग्राम, ट्विटरवर महाराजांचं चित्र रेखाटतानाचा व्हिडिओही शेअर केला आहे.

रितेश लवकरच शिवाजी महाराजांवर चित्रपटही घेऊन येत आहे. रितेश आणि जेनेलिया देशमुखच्या ‘मुंबई फिल्म कंपनी’ अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती होणार असून दिग्दर्शक रवी जाधव हा ‘छत्रपती शिवाजी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2019 6:21 pm

Web Title: actor ritesh deshmukh tweet on chhatrapati shivaji maharaj birth anniversary
Next Stories
1 VIDEO : लगीन घाईची धम्माल गोष्ट सांगणाऱ्या ‘वेडिंगचा शिनेमा’चा टीझर पाहिलात का?
2 घटस्फोटाचा निर्णय बदलण्याचा कुटुंबीयांनी दिला होता सल्ला – मलायका
3 Pulwama Terror Attack : ‘नोटबुक’च्या निर्मात्यांकडून शहिदांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २२ लाखांची मदत
Just Now!
X