News Flash

सध्या घरोघर बिग बॉसचाच खेळ!

करोनामुळे सध्या सगळेच आपापल्या घरात ‘बिग बॉस’ खेळत आहेत

बॉलीवूडचा गाडाच सध्या करोनामुळे थंड पडला असल्याने आघाडीची खान मंडळी आणि त्यातही सलमान खान यावर्षी तरी चाहत्यांना कुठल्याच माध्यमावर मनोरंजन करताना दिसणार नाहीत, अशी खूणगाठ चाहत्यांनी बांधली होती. पण जसजसे टाळेबंदीचे नियम शिथिल होत गेले आणि टेलीविश्व पुन्हा त्याच जोमाने कामाला लागले. तसतसे सलमान खान आणि अमिताभ बच्चन हे दोन लोकप्रिय कलाकार त्यांच्या प्रसिद्ध शोजच्या माध्यमातून टीव्हीच्या पडद्यावर परतले आहेत. ‘के बीसी’च्या नव्या पर्वाचा धडाका सुरू झाला आहे आता ‘बिग बॉस’च्या १४ व्या पर्वाचेही बिगूल वाजले असून त्यानिमित्ताने का होईना सलमान खान चाहत्यांसमोर आला आहे. करोनामुळे सध्या सगळेच आपापल्या घरात ‘बिग बॉस’ खेळत आहेत, अशी मिश्कील टिप्पणी करणाऱ्या सलमानने गेल्या ३० वर्षांत पहिल्यांदाच इतका काळ आपण चित्रीकरणाविना काढला असल्याचे सांगितले.

‘बिग बॉस’च्या नव्या पर्वाची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सलमानने गेल्या वर्षीचा ‘बिग बॉस’ विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्याबरोबर गप्पा मारत टाळेबंदीतील अनुभव मोकळेपणाने सांगितले. गेल्या सहा महिन्यांत मी माझ्या फार्महाऊसमधून कु ठेही बाहेर पडलो नव्हतो. आज पहिल्यांदाच मी ‘बिग बॉस’च्या चित्रीकरणासाठी म्हणून बाहेर पडलो आहे. माध्यमांवर काहीही सांगितले जात असले तरी मी ज्या काही गोष्टी के ल्या त्या माझ्या फार्महाऊसच्या आवारातच के ल्या आहेत, असेही त्याने सांगितले. वांद्रे येथील आपल्या घरात ज्येष्ठ सदस्यांची संख्या जास्त आहे. कुटुंबात सध्या अहिल आणि अयात ही दोन्ही छोटी मुलंही आहेत, त्यामुळे सध्या मी घरापासून दूर राहण्यावरच भर देतो आहे, असे त्याने सांगितले. वांद्रे येथील अपार्टमेंटमध्ये मी पहिल्या मजल्यावर आणि माझे आई-वडील दुसऱ्या मजल्यावर राहतात. मी त्यांच्याबरोबर घरी राहून चित्रीकरणात सहभाग घेतला तर कुठल्याही निमित्ताने माझ्या घरातील ज्येष्ठ सदस्यांना करोनाचा संसर्ग होईल, अशी भीती मला वाटते. त्यांना त्याच्याशी सामना करणे जड जाईल. त्यामुळे मी स्वत:च त्यांच्यापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे, असेही त्याने स्पष्ट के ले.

टाळेबंदीच्या या काळात सलमान खानने आपल्या फार्महाऊसचा पुरेपूर वापर करून घेतला आहे. २० वर्षांपूर्वी माझ्या वडिलांनी ही जागा विकत घेतली होती, आज ती आम्हाला सर्वार्थाने खूप फायदेशीर ठरते आहे, असे सांगणाऱ्या सलमानने टाळेबंदीच्या या काळात आपल्या शेतात भाताची लावणीही के ली आहे. मी लावलेली भातशेती आता बहरलेली दिसते, तेव्हा खूप समाधान वाटते, असे सांगणाऱ्या सलमानने याच फार्महाऊसमध्ये टाळेबंदीच्या काळात गाण्याचे चित्रीकरणही के ले होते. एवढेच नाही तर ‘बिग बॉस’शोच्या तंत्रज्ञांनाही यावेळी त्याच्याच फार्महाऊसमध्ये जेवण बनवून ते दररोज पाठवण्यात येणार आहे. सहा महिन्यांनी का होईना, टाळेबंदी शिथिल झाली असल्याने चित्रिकरण सुरू झाले ही आनंदाची गोष्ट आहे. पण अजून करोनाची भीती टळलेली नाही. ‘बिग बॉस’च्या घरात जे कलाकार राहणार आहेत, त्यांना करोनाचा धोका होण्याची शक्यता कमी आहे. शो सुरू होण्याआधी १५ दिवस स्पर्धकांना विलगीकरणात रहावे लागणार आहे, त्यानंतर ते घरात प्रवेश करतील. शो सुरू असेपर्यंत बाहेर राहून जे तंत्रज्ञ आणि इतर लोक काम करणार आहेत त्यांना जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. त्यांचे राहणे आणि खाणे या दोन्ही गोष्टी काटेकोरपणे जपल्या गेल्या पाहिजेत, असेही त्याने स्पष्ट के ले. यावर्षी या शोसाठी सलमानने आपल्या मानधनात मोठी घट के ली असून त्या रकमेत या शोसाठी जास्तीत जास्त तंत्रज्ञ आणि इतर कामगारांना सेटवर काम दिले जाईल, अशी हमीही त्याने वाहिनीच्या अधिकाऱ्यांकडून घेतली असल्याचे शोच्या सूत्रांनी सांगितले.

करोनाच्या या कठीण काळात एकीक डे चित्रीकरण सुरू झाले असल्याने लोकांना रोजगार मिळेल, पण दुसरीकडे संसर्गाचा धोका कमी झालेला नसल्याने अजून टांगती तलवार इंडस्ट्रीतील लोकांवर असल्याचेही त्याने यावेळी मान्य के ले. मी स्वत: अजून थोडा घाबरलेलो आहे, हल्ली तर साधा खोकला किं वा कफ झाला तरी मला भीती वाटते, असे त्याने सांगितले. टाळेबंदीच्या या पाच-सहा महिन्यांत सर्वात मोठा ताण कोणता जाणवला? या प्रश्नावर गेले सहा महिने मी काहीच काम के लेले नाही याचा ताण जास्त आला आहे, अशी भावना त्याने मोकळेपणाने व्यक्त के ली. गेल्या तीस वर्षांच्या काळात मी एकही सुट्टी घेतलेली नाही. दरवर्षी २५ डिसेंबर ते ३ जानेवारी या कालावधीत मी सुट्टी घेतो. ते दिवस वगळता सातत्याने कामात असतो त्यामुळे या सहा महिन्यांत मी जणू ३० वर्ष मागे फे कला गेलो आहे, असे वाटत असल्याचेही त्याने यावेळी सांगितले. आजूबाजूला सुरू असलेल्या वादंगाबाबत त्याने काही बोलणे टाळले असले तरी या काळात जितने कम दुश्मन, उतनेही सुखी रहोगे, असा सल्ला त्याने सगळ्यांना दिला आहे. ज्यांना तुम्ही आवडता, त्यांना तुम्ही अधिक आवडाल आणि जे तुमचा तिरस्कार करतात त्यांनाही तुम्ही आवडायला लागाल, असे काम करा. कामाशी प्रामाणिक राहा आणि प्रामाणिकपणे काम करा. तुमचे काम छंद असल्याप्रमाणे प्रेमाने, आवडीने करा. तुम्हाला तुमचे काम आवडायला लागेल, असा सल्लाही सलमानने आपल्या चाहत्यांना दिला आहे.

बिग बॉसच्या घरात जे कलाकार राहणार आहेत, त्यांना करोनाचा धोका होण्याची शक्यता कमी आहे. शो सुरू होण्याआधी १५ दिवस स्पर्धकांना विलगीकरणात रहावे लागणार आहे, त्यानंतर ते घरात प्रवेश करतील. शो सुरू असेपर्यंत बाहेर राहून जे तंत्रज्ञ आणि इतर लोक काम करणार आहेत त्यांना जास्त काळजी घ्यावी लागणार आहे.  सलमान खान

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2020 1:08 am

Web Title: actor salman khan shoots for bigg boss 14 zws 70
Next Stories
1 सुशांतसोबत असलेल्या नात्यावर साराने दिली कबुली?
2 वेगळ्या लूकमुळे ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याला ओळखणं ही झालं कठिण
3 ‘अप्रतिम..’, सुमीत राघवनने शेअर केला बालसुब्रमण्यम यांनी गायलेल्या मराठी गाण्याचा व्हिडीओ
Just Now!
X