01 October 2020

News Flash

केनिया सरकारने लोकांच्या सुरक्षिततेसाठी लढवली अनोखी शक्कल, अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ

सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे

चीनमधील वुहानमधून जगभरात पसरलेल्या करोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. चीनबरोबरच इतर ९० हून अधिक देशांमध्ये हा व्हायरस पसरला आहे. अनेक देशांमध्ये करोनाचा वाढता संसर्ग थांबवण्यासाठी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. पण अनेक देशांमध्ये लॉकडाउन असूनही लोकं रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या मालिकेतील सतीश शाह यांनी असाच व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. पण हा व्हिडीओ भारतातील नसून केनियामधील आहे.

सतीश यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये एक आदिवासी रस्त्यावर उभे असणाऱ्या लोकांना मारताना दिसत आहे. सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी केनियामध्ये कर्फ्यूची घोषणा केल्यानंतर प्रशासनाने आदिवासी जमातीची मदत घेतली आहे. कारण तेथील लोक पोलिसांना घाबरत नाहीत असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

सतीश यांनी शेअर केलेला व्हिडीओ खरच केनियामधील आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण हा व्हिडीओ मात्र सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल झाला आहे.

सध्या सतीश यांची भूमिका असलेली ‘साराभाई वर्सेस साराभाई’ हा मालिका तब्बल १६ वर्षांनंतर पुन्हा दाखवण्यात येत आहे. ६ एप्रिल पासून ही मालिका दररोज सकाळी १० वाजता स्टार भारत वाहिनीवर सुरु झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2020 4:11 pm

Web Title: actor satish shah share kenyan government uses the maasai tribe for the curfew avb 95
Next Stories
1 ‘अश्रफ भाटकरची भूमिका साकारणं म्हणजे…’; अभिनेत्रीने शेअर केला अनुभव
2 ‘पुन्हा फालतू ट्विट करू नकोस’; भाजपाच्या आयटी सेलनं सिद्धार्थ चांदेकरला सुनावलं
3 ‘माझं नाव चँग आहे करोना व्हायरस नाही’; चिनी समजून हिणवणाऱ्यांना अभिनेत्याने सुनावले
Just Now!
X