News Flash

शाहरुख खान- कटप्पाचा ‘हा’ चित्रपट माहित आहे का ?

कटप्पा म्हणूनच सर्वांच्या परिचयाचे असलेल्या सत्यराज यांचा आज वाढदिवस आहे.

‘बाहुबली’ चित्रपटातील “कटप्पा ने बाहुबली को क्युँ मारा”, हा संवाद लोकप्रिय झाला आणि बघता-बघता कटप्पा हा घराघरात पोहोचला. अभिनेता सत्यराज यांनी बाहुबली चित्रपटात कटप्पा ही भूमिका साकारली आहे. आज त्याच कटप्पाचा म्हणजे सत्यराज यांचा वाढदिवस. विशेष म्हणजे सत्यराज यांनी बॉलिवूडमधील काही चित्रपटांमध्येदेखील काम केलं आहे, हे फार कमी जणांना माहित आहे. तसंच त्यांनी अभिनेता शाहरुख खानसोबतदेखील स्क्रीन शेअर केली आहे.

सत्यराज या नावाने रुपेरी पडद्यावर काम करणारे कटप्पा यांचे मूळ नाव रंगराज सुबैया असे आहे. त्यांनी बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान याच्यासोबत देखील काम केले आहे. होय, रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या चित्रपटात शाहरुख आणि दीपिका पदुकोण यांच्यासोबत काम केले आहे. या चित्रपटात त्यांनी दुर्गेश्वर म्हणजेच दीपिका पदुकोणच्या वडिलांची व्यक्तिरेखा साकारली होती. त्यात त्यांनी एका मोठ्या डॉनची व्यक्तिरेखा साकारलेली.

सत्यराज यांनी रुपेरी पडद्यावर शाहरुखच्या सासरेबुवांची व्यक्तिरेखा साकारली होती. ‘चेन्नई एक्स्प्रेस’ चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूड चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. हा चित्रपट त्यावेळी हिट झाला होता. पण, या चित्रपटाने सत्यराज यांनी प्रसिद्धी मिळाली नाही. पण, ‘बाहुबली’तील कटप्पाच्या भूमिकेने त्यांना देशभरातच नाही तर देशाबाहेरही प्रसिद्धी मिळवून दिली. या चित्रपटाने कमाईचा एक नवा रेकॉर्ड रचला होता. हा चित्रपट प्रत्येक बाजूने विशेष राहिला. पण, यातील कटप्पा आणि बाहुबली या दोन व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवली. या दोघांवर भन्नाट असे विनोदही करण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2020 9:52 am

Web Title: actor satyaraj aka katappa played shahrukh khans father in law character in chennai express ssj 93
Next Stories
1 अभिनेता शरद मल्होत्राला करोनाची लागण
2 ‘सुशांतला न्याय मिळेल का?’; श्वेता सिंह किर्तीच्या पतीचा प्रश्न
3 ‘पिछे देखो पिछे’ म्हणत नेटकऱ्यांची मनं जिंकणाऱ्या अहमदचा सोनू सूदसाठी खास मेसेज; म्हणाला…
Just Now!
X