News Flash

‘जे पेराल तेच उगवेल’; रियाला अटक होताच शेखर सुमन यांची प्रतिक्रिया

शेखर सुमन सातत्याने सुशांत सिंह राजपूतप्रकरणी ट्विट करत आहेत

अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला ड्रग्स सेवनासह अन्य आरोपांखाली मंगळवारी अटक करण्यात आली. याप्रकरणी सध्या कलाविश्वात विविध चर्चा रंगत असून अनेक कलाकार सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. यामध्येच अभिनेता शेखर सुमन यांनी त्यांचं मत मांडलं आहे. ‘जे पेराल तेच उगवेल’, असं म्हणत रियाला टोला लगावला आहे.

“हे खरंच मोठ यश आहे. त्याच्याकडे कायम न्याय मिळतो. न्यायासाठी तुम्ही उठवलेला आवाज आणि मेहनतीचं खऱ्या अर्थाने जीच झालं. तुम्ही जे पेराल तेच उगवेल”, अशा आशयाचं ट्विट शेखर सुमन यांनी केलं आहे.

आणखी वाचा- “रियाचा अकारण बळी दिला जातोय”; NCBच्या कारवाईला सोनम कपूरचा विरोध

आणखी वाचा- रियाच्या अटकेनंतर बॉलिवूड कलाकारांनी पोस्ट केला ‘तो’ खास मजकूर

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतला न्याय मिळावा यासाठी शेखर सुमन यांनी सुशांतच्या कुटुंबीयांना पाठिंबा दिला आहे. तसंच आतापर्यंत अनेक वेळा या प्रकरणी त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांचं मत नोंदवलं आहे. त्यातच रिया चक्रवर्तीला एनबीसीने अटक केल्यानंतर एकच खळबळ उडाली. अनेक कलाकारांनी रियाला पाठिंबा दिला आहे. तर काहींनी तिच्यावर टीका केली आहे. यात सुशांत सिंह राजपूतची बहीण श्वेता सिंह किर्ती, अंकिता लोखंडे अशा अनेकांनी रियावर टीका केली आहे. तर दुसरीकडे काही कलाकारांनी रियाला पाठिंबा दिला आहे. इतकंच नाही तर सध्या सोशल मीडियावर रियाला स्पोर्ट करणारा हॅशटॅगदेखील ट्रेण्ड होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2020 2:19 pm

Web Title: actor shekhar suman have expressed their opinion about rhea chakraborty arrested by ncb ssj 93
टॅग : Sushant Singh Rajput
Next Stories
1 नव्या भूमिकेसाठी प्राजक्ता गायकवाड सज्ज; घेतीये ‘ही’ खास मेहनत
2 ‘आई कुठे काय करते’ मालिकेत येणार नवं वळण
3 “रियाचा अकारण बळी दिला जातोय”; NCBच्या कारवाईला सोनम कपूरचा विरोध
Just Now!
X