News Flash

“तिने माझे मानसिक आणि शारिरीक शोषण केले…”, शिवम पाटीलने अभिनेत्रीवर केला आरोप

सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने त्याच्या नैराश्येचे कारण सांगितले आहे.

छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शोमधून नावारुपास आलेला मराठमोळा अभिनेता शिवम पाटील सध्या बॉलिवूडमध्ये आपली जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. तीन वर्षांपूर्वी अय्यारी या चित्रपटातून शिवमने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्याने एक छोटीशी भूमिका साकारली होती. तरी देखील समिक्षकांना त्याची भूमिका आवाडली होती. त्यामुळे आता त्याला एक चांगली आणि मोठी भूमिका मिळेल अशी आशा होती. परंतु अभिनेत्री मेधा शंकरन आणि इतर दोन महिलांनी केलेल्या आरोपानंतर त्याला काम मिळेनास झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवम नैराश्येचा सामना करत होता. आता शिवमने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मेधाने केलेल्या या सगळ्या आरोपांवर उत्तर देत त्याच्या सोबत घडलेल्या या सगळ्या गोष्टींचा खुलासा केला आहे.

शिवमने ही पोस्ट त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने नैराश्येचा खुलासा केला आहे. मेधा सतत माझा अपमान करायची. मेधा आणि माझं रिलेशनशिप अत्यंत टॉक्सिक होतं. माझ्यावर विनोद करणायची. तिने अनेकदा माझे मानसिक आणि शारिरीक शोषण केले आहे. ज्या गोष्टींशी माझं भावनिक नातं होतं अशा गोष्टी तिने माझ्या डोळ्यांसमोर नष्ट केल्या. पण मी तिच्या बाबत कोणालाही काही सांगू शकतं नव्हतो. कारण मला माझं करिअर संपण्याची भीती वाटत होती. किंबहुना ती भीती मेधानच माझ्या मनात निर्माण केली होती,” असे शिवम म्हणाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shivam Patil (@shivampatil90)

पुढे तो म्हणाला, “पण एक दिवस या त्रासातून मुक्त होण्याचा निर्णय मी घेतला. तिच्या पासून वेगळं झालो पण तरी देखील तिनं त्रास देणं सोडलं नाही. जर मी आमच्या नात्याविषयी बाहेर कुठेही काही बोललो, कोणाकडे ही तक्रार केली तर माझं करिअर संपू शकतं. अशी अप्रत्यक्ष धमकीच तिने मला दिली होती. गेली दोन वर्ष मी नैराश्येत होतो. आत्महत्या करण्याचा विचारही माझ्या मनात अनेकदा येऊन गेला,” अशा आशयाची एक मोठी पोस्ट त्याने शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shivam Patil (@shivampatil90)

 

View this post on Instagram

 

A post shared by Medha Shankar (@medhashankar)

आणखी वाचा : संजय दत्तच्या नावाचं सिंदूर लावतात रेखा?

या पोस्टमध्ये त्याने मेधासोबत सुरु झालेल्या त्याच्या रिलेशनशिपपासून अगदी ब्रेकअपपर्यंतच्या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. एवढंच नाही तर शिवमने या प्रकरणी मुंबई पोलिसांकडे तक्रार ही केली आहे. तर पोलिस लवकर या प्रकरणी कारवाई करतील अशी आशा असल्याचं तो म्हणाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2021 11:14 am

Web Title: actor shivam patil breaks silence on his abuse allegations dcp 98
Next Stories
1 ‘ये रिश्ता क्या कहलता है’ फेम अभिनेता करण मेहराला अटक, पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई
2 अभिनेता जॅकी भगनानीसह सिनेसृष्टीतील ९ जणांवर बलात्कार आणि विनयभंगाचा मॉडेलचा आरोप
3 “सोनू सूद भारताचा पंतप्रधान झाल्यास…”
Just Now!
X