करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २५ मार्चपासून लॉकडाउन सुरु आहे. लॉकडाउन सुरु झाल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या अनेक स्थलांतरित मजुरांचे हाल झाले आहेत. वेगवेगळ्या राज्यांमध्ये अडकून पडलेल्या मजुरांनी चालत आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतल्याने मागील जवळजवळ दोन महिन्यांपासून देशातील अनेक राज्यांमधून मजूर चालत आपल्या राज्यांमध्ये परत जाताना दिसत आहे. मात्र तिसऱ्या आणि चौथ्या लॉकडाउनमध्ये श्रमिक विशेष ट्रेन्सच्या माध्यमातून मजुरांना त्यांच्या राज्यात पोहचवण्याची सुविधा देण्यात आली आहे. असं असलं तरी अनेक श्रमिकांना आपल्या राज्यात जाण्यात अडचणी येत आहेत. यासाठी बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपटात खलनायकाची भूमिका बजावण्यात प्रसिद्ध असलेल्या सोनू सुदने पुढाकार घेतला असून त्याने मुंबईमध्ये अडकलेल्या उत्तरेतील मजुरांना घरी पोहचवण्यासाठी बस गाड्यांची व्यवस्था केली आहे.

बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपटात खलनायकाची भूमिका बजावण्यात प्रसिद्ध असलेल्या सोनू सुदने या काळात अनेक कामगारांना आपल्या घरी पोहचण्यासाठी बस गाड्यांची सोय केली. काही दिवसांपूर्वी सोनूने मुंबईत अडकलेल्या कर्नाटकातील कामगारांना घरी जाण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांची परवानगी घेत १० बस गाड्यांची सोय केली. त्याच्या याच कामामुळे आता थेट सोशल नेटवर्किंगवरुन त्याला अनेकजण घरी पोहचवण्यासाठी मदत करण्याची विनंती करत आहेत. अशाच एका परराज्यात अडकलेल्या विनोद कुमार नावाच्या व्यक्तीने सोनूला ट्विटवर टॅग करत “सोनू सर तुमची मदत हवीय. आम्हाला पूर्व उत्तर प्रदेशमधील कोणत्याही ठिकाणी पोहचवण्याची सोय करा तिथून आम्ही पायी चालत आमच्या गावी जाऊ सर,” अशा शब्दात मदत मागितली.

garvit and nandini suicide instagram
‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याची अवघ्या पंचवीशीतच आत्महत्या
Taiwan Earthquake
Taiwan Earthquake : भूकंपाची चाहूल लागताच कुत्र्याने घरातल्या लोकांना केले सावध, तैवान येथील भूकंपाचा व्हिडीओ व्हायरल
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद
Best Selling Bike
‘या’ बाईकने TVS Raider, Pulsar, Apache सह सर्वांचा केला खेळ खल्लास? २९ दिवसात २ लाख ७७ हजाराहून अधिक लोकांनी केली खरेदी

सोनूनेही या व्यक्तीच्या ट्विटची दखल घेतली. मात्र त्याने दिलेला रिप्लाय सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होताना दिसत आहे. आम्हाला उत्तर प्रदेशच्या पूर्वेकडील भागात कुठेही उतरवा अशी मागणी करणाऱ्याला सोनूने, “चालत का जाणार मित्रा? नंबर पाठव तू” असा रिप्लाय दिला आहे.

दहा हजारहून अधिक जणांनी सोनूचे हे ट्विट रिट्विट केलं आहे. अनेकांनी या ट्विटवर प्रतिक्रिया देताना सोनूचं कौतुक केलं आहे. अशाप्रकारे थेट ट्विटवरुन उत्तर देत परराज्यांमध्ये अडकलेल्यांना सोनूने दिलासा देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही याआधीही त्याने अशाप्रकारे काहीजणांना थेट ट्विटवरुन मदत केली आहे. तुम्हीच पाहा त्याचे हे ट्विट…

परवा आईच्या कुशीत झोपशील

तो घरी चाललाय

जायचय नाही जातोय

झाली व्यवस्था…

सोनूच्या कामाने प्रभावित होऊन महाराष्ट्र राज्यातील कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी ट्विटरवरुन त्याचे कौतुक केलं आहे. पडद्यावर खलनायकाचं काम करणारा, प्रत्यक्ष आयुष्यात हिरोचं काम करत असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.