28 November 2020

News Flash

अभिनेता सुबोध भावे आणि कुटुंबाला करोनाची लागण

देशात एका दिवसात आढळले ८०,००० करोना बाधित

करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. संपूर्ण जगात पसरलेल्या या प्राणघात विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. दरम्यान प्रसिद्ध मराठी अभिनेता सुबोध भावे आणि त्याच्या कुटुंबीयांना करोनाची लागण झाली आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने घरातच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

“मी, मंजिरी आणि माझा मोठा मुलगा कान्हा आम्हा तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही घरीच स्वतःला क्वारंटाईन करून घेतले आहे. आम्ही तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने उपचार घेत आहोत. तुम्ही सगळे काळजी घ्या आणि सुरक्षित रहा. गणपती बाप्पा मोरया.” असं ट्विट करुन सुबोधने करोनाची लागण झाल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे.

एका दिवसात आढळले ८०,००० करोना बाधित

लॉकडाउनच्या सुरूवातीच्या टप्प्यात नियंत्रणात असलेली देशातील रुग्णसंख्या ३५ लाखांच्या पुढे गेली आहे. मागील काही आठवड्यांपासून देशातील रुग्णसंख्यावाढीचा वेग प्रचंड वाढला असून, कमी कालावधीत दुप्पट रुग्णसंख्या होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. रुग्णवाढीच्या अतिवेगामुळे भारताच्या नावे नकोशा जागतिक विक्रमाची नोंद झाली आहे. देशात मागील काही आठवड्यांपासून ७० हजार ते ८० हजारांच्या सरासरीनं दररोज रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या वेगानं वाढू लागली आहे. महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये करोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढल्यानं हा दिवसभरात आढळून येणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढला आहे. करोनाचा शिरकाव झाल्यापासून देशात पहिल्यांदाच एका दिवसात ८० रुग्ण आढळून आले आहेत. विशेष बाब म्हणजे ऑगस्ट महिन्याचा शेवटच्या आठवड्यात करोनाची स्थिती आणखी बिकट होत असल्याचेच आकडेवारीतून दिसून आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2020 1:54 pm

Web Title: actor subodh bhave corona positive mppg 94
Next Stories
1 कंगना रणौतच्या लोकप्रियतेला उतरती कळा?; दिवसाला ५० हजार फॉलोअर्स करतायत अनफॉलो
2 “रिया केवळ एक मोहरा, खरा मास्टर माईंड…; सुशांत प्रकरणावर कंगनाचा खळबळजनक दावा
3 सुशांतला न्याय मिळणारच, कारण…; श्वेता सिंह किर्तीने व्यक्त केला विश्वास
Just Now!
X