03 August 2020

News Flash

मराठीतील ‘या’ लोकप्रिय अभिनेत्यावर आली फुलं विकण्याची वेळ

उत्तम अभिनयामुळे त्याने मराठी चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे

‘पार्टी’, ‘शिकारी’ या सिनेमातून आणि विशेषत: ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून लोकप्रिय झालेला कलाकार म्हणजे सुव्रत जोशी. उत्तम अभिनयामुळे त्याने मराठी चाहत्यांच्या मनात एक स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे त्याचा चाहतावर्ग अफाट आहे. विविध चित्रपट, मालिकांतून आपल्या अभिनयाची छाप उमटवलेला सुव्रत चक्क रस्त्यावर फुलं विकतांना दिसून आला. सध्या त्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो चर्चेचा विषय ठरत आहे.

सुव्रत लवकरच ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटात झळकणार असून या चित्रपटात तो फुलवाल्याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून यात सुव्रत फुलविक्रेत्याच्या रुपात दिसून येत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शंतनू गणेश रोडे यांनी केलं आहे.

 

View this post on Instagram

 

“एक गोष्ट पैठणीची” च्या पुष्पगुच्छामधे आपलाही रंग आणि गंध असणार ही गोष्ट असणार ही गोष्ट सुखावणारी आहे! तुमच्या शुभेच्छा हव्या आहेत! चित्रीकरण सुरू झालेल्या या चित्रपटातील माझ्या भूमिकेविषयी थोडंसं! आतापर्यंत विविध चित्रपट, मालिकांतून आपल्या अभिनयाची छाप उमटवलेला अभिनेता सुव्रत जोशी आता फुलवाल्याच्या भूमिकेत दिसणार आहे. शंतनू गणेश रोडे  दिग्दर्शन करत असलेल्या “गोष्ट एका पैठणीची”या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं आहे. प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेच्शो फिल्म्स गोष्ट एका पैठणीची” या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. अभिनेत्री सायली संजीव या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सायलीसह सुव्रत जोशीचीही अतिशय वेगळी आणि महत्त्वाची भूमिका आहे. भोर इथं या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे. फुलवाल्याच्या भूमिकेसाठी फुलपुडी बांधण्यापासून ते बुके तयार करण्यापर्यंत काही खास कौशल्यं सुव्रतनं शिकून घेतली आहेत. ‘माझ्या रोजच्या जगण्यापेक्षा काहीतरी वेगळं असलेल्या, मी कधीही अनुभव न घेतलेल्या विश्वातल्या भूमिका मला करायला आवडतात. कारण अभिनेता म्हणून त्यात आव्हान असतं. या चित्रपटातील फुलवाल्याची भूमिकाही तशीच आहे. या भूमिकेसाठी कित्येक फुलवाल्यांचं तासंतास निरीक्षण केलं. फुलपुडी बांधणं, झटपट हार करणं, बुके तयार करणं शिकून घेतलं. ही कामं एका अर्थानं कलाच आहे असं मला वाटतं. “गोष्ट एका पैठणीची” या चित्रपटाची कथा अतिशय सुंदर आहे. या चित्रपटाचा मी एक भाग आहे हा आनंदाचा आणि समृद्ध करणारा अनुभव आहे,’ असं सुव्रतनं सांगितलं. #new #film #shooting #flowers #florist

A post shared by Sula (@suvratjoshi) on


या चित्रपटासाठी सुव्रत विशेष मेहनत घेत असून तो फुलपुडी बांधण्यापासून ते बुके तयार करण्यापर्यंत अनेक गोष्टी शिकत आहे. ‘माझ्या रोजच्या जगण्यापेक्षा काहीतरी वेगळं असलेल्या, मी कधीही अनुभव न घेतलेल्या विश्वातल्या भूमिका मला करायला आवडतात. कारण अभिनेता म्हणून त्यात आव्हान असतं. या चित्रपटातील फुलवाल्याची भूमिकाही तशीच आहे. या भूमिकेसाठी कित्येक फुलवाल्यांचं तासंतास निरीक्षण केलं. फुलपुडी बांधणं, झटपट हार करणं, बुके तयार करणं शिकून घेतलं. ही कामं एका अर्थानं कलाच आहे असं मला वाटतं. ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाची कथा अतिशय सुंदर आहे. या चित्रपटाचा मी एक भाग आहे, हा आनंदाचा आणि समृद्ध करणारा अनुभव आहे,’ असं सुव्रतनं सांगितलं.

दरम्यान, सुव्रतसोबत या चिपटामध्ये अभिनेत्री सायली संजीवदेखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात दोन्ही कलाकार अतिशय वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. सध्या या चित्रपटाचं भोर येथे चित्रीकरण सुरु आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2019 2:40 pm

Web Title: actor suvrat joshi to play a florist in his upcoming film goshta eka paithanichi ssj 93
Next Stories
1 तेव्हा मला आत्महत्या करावीशी वाटत होती- नेहा कक्कर
2 #Chhapaak : ..अन् दीपिका ढसाढसा रडली
3 जेव्हा जेव्हा शाहिद तो चित्रपट पाहायचा तेव्हा त्याला कोसळायचे रडू
Just Now!
X