दिवाळी म्हणजे रोषणाई, आकाशकंदील, पणत्या, फराळ आणि दारासमोर रेखाटलेली सुंदर रांगोळी होय. हल्ली इन्सटंटच्या जमान्यात सुरेख अशी रांगोळी रेखाटायला वेळ कोणाला आहे. रांगोळीचे स्टिकर्स लावले किंवा छाप्याचा वापर केला की रांगोळी तयार. ही रांगोळी झटपट काढता येत असली तरी स्वत: वेळ देऊन अंगणात रेखाटलेल्या रांगोळीची मजाच काही निराळी असते हेही तितकंच खरं.
अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनं देखील आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिनं रेखाटलेल्या सुंदर अशा रांगोळीचा फोटो पोस्ट केला आहे. अंगणात बसून काढलेल्या रांगोळीच मजाच काही और म्हणत तिनं ही रांगोळी ट्विटर आणि तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. शंकराच्या पिंडीवर दुग्धाभिषेक करतानाचं चित्र तिनं रांगोळीद्वारे रेखाटलं आहे.
अंगणात बसून रांगोळी घालण्याची मजा काही औरच !!
॥ शुभ दिपावली ॥ pic.twitter.com/0ZqPhAVB5v
— Tejaswini Pandit (@tejaswini_tweet) November 7, 2018
मोठी अशी रांगोळी रंगासोबतच तिनं फुलांनीही सजवली आहे. तसेच या रांगोळीतून तिनं आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
First Published on November 8, 2018 10:08 am