News Flash

‘टार्झन..’ फेम वत्सल सेठ लग्नबंधनात अडकला

इस्कॉन मंदिरात पार पडला लग्नसोहळा

वत्सल सेठ, इशिता दत्ता

‘टार्झन: द वंडर कार’ या चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेला अभिनेता वत्सल सेठ नुकताच विवाहबंधनात अडकला. मुंबईतील इस्कॉन मंदिरात त्याने अभिनेत्री इशिता दत्ताशी लग्न केले. ‘दृश्यम’ या चित्रपटात अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारणाऱ्या इशिताला वत्सल गेल्या काही महिन्यांपासून डेट करत होता. कुटुंबीय, जवळचे नातेवाईक आणि मोजक्या मित्रमंडळींच्या उपस्थित अगदी साध्या पद्धतीने हा लग्नसोहळा पार पडला.

‘लाइफ ओके’ वाहिनीवरील ‘रिश्तों का सौदागर बाजीगर’ या मालिकेत हे दोघे एकत्र भूमिका साकारत होते. तेव्हापासूनच हे दोघे डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. मात्र दोघांनीही कधीच उघडपणे नात्याचा स्वीकार केला नाही.

इशिताचा आगामी चित्रपट ‘फिरंगी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये ती कॉमेडीयन कपिल शर्मासोबत भूमिका साकारणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 8:25 pm

Web Title: actor vatsal seth married drishyam fame ishita dutta in iskcon
Next Stories
1 VIDEO : झहीर- सागरिकाच्या रिसेप्शनमध्ये ‘विरुष्का’च्या परफॉर्मन्सने लावले चार चाँद
2 केरळ उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही ‘इफ्फी’त ‘एस दुर्गा’ला प्रवेश नाहीच
3 अक्षय कुमारच्या मुलीसोबत दिसले हे स्टार किड्स
Just Now!
X