News Flash

विराज कुलकर्णीने शेअर केला ‘माझी आई’ निबंधाचा शाळेतील किस्सा

मातृदिनानिमित्ताने शेअर केला अनुभव

(photo-instagram@virajas13_official)

मातृदिनाच्या निमित्ताने अनेक मराठी कलाकारांनी आईसोबतचे खास फोटो शेअर करत मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचसोबत काही कलाकारांनी आईसोबत असलेल्या घट्ट नात्याचा उलगडा केला आहे. ‘माझा होशील ना’ या मालिकेतील आदित्य म्हणजेच विराजस कुलकर्णीने मातृदिनानमित्ताने काही खास आठवणींना उजाळा दिलाय.

अभिनेता विराजस कुलकर्णी म्हणजचे प्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्मात्या मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. लहानपणा पासून विराजसने आईला अभिनय करताना पाहिलं आहे. त्यामुळे आपली आई अभिनेत्री आहे याबद्दल वेगळेपण असं कधी जाणवलं नसल्याचं तो म्हणाला.

यावेळी विराजसने शाळेतील एक खास किस्सा शेअर केला आहे. “शाळेत असताना ‘माझी आई’ हा निबंध लिहण्यासाठी दिला होता.शिक्षकांनी नेहमीप्रमाणे आम्हाला काही गोष्टी शिकवल्या होत्या. यात माझी आई डबा बनवून देते..माझी आई माझ्यासाठी अनेक गोष्टी करते असं शिकवलं असताना मी मात्र वेगळा निबंध लिहला. माझी आई चोविस तास माझ्यासोबत नसल्याने माझे इतर मित्र सांगतात त्याप्रमाणे ती कटकट माझ्या मागे नसते.” अशा आशयाचा निबंध लिहल्याचं त्याने सांगितलं.

यासोबतच मदर्स डेच्या निमित्ताने आईला मनातलं सांगता येतं, तिच्याबद्दलचं प्रेम व्यक्त करता येत असं विराजस म्हणाला. सोबतच विराजसने त्याच्या सर्व चहत्यांना आणि सर्व मातांना मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2021 3:43 pm

Web Title: actor virajas kulkarni share childhood memories in school days essay on my mother mrunal kulkarni kpw 89
Next Stories
1 सातारा : फलटण येथे हॉस्पिटलमधील वॉर्ड बॉयला अटक; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
2 “स्तनपानाला अद्यापही आपल्याकडे..”; मातृदिनाला अमृता रावने व्यक्त केली खंत
3 “आईचं नावदेखील गौरी आहे म्हणूनच…”, अभिनेत्री गिरिजा प्रभू म्हणाली…
Just Now!
X