29 September 2020

News Flash

टीम इंडियाच्या पराभवाबाबत विवेक ओबेरॉयने शेअर केलं GIF, चाहत्यांनी झापले

विवेक ओबेरॉयला नेटकऱ्यांनी चांगलेच सुनावले आहे

विवेक ओबेरॉय

अभिनेता विवेक ओबेरॉय याने भारत विरूद्ध न्यूझीलंडचा जो विश्वचषकातला सामना रंगला होता त्याबाबत एक GIF ट्विट केले आहे. भारताचा या सामन्यात पराभव झाला त्यामुळे भारताचं विश्वचषकाचं स्वप्न भंगलं. १० जुलै रोजी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा १८ धावांनी पराभव केला. हा पराभव टीम इंडियाच्या आणि तमाम भारतीयांच्या मनाला बोचणी लावणारा ठरला. याचसंदर्भात अभिनेता विवेक ओबेरॉयने एक GIF शेअर केलं आहे.

काय आहे GIF मध्ये?

विवेक ओबेरॉयने शेअर केलेल्या GIF मध्ये एका व्यक्तीला रस्त्याने जात असताना एक महिला त्याच्याकडे येऊन त्याला मिठी मारण्याच्या तयारीत आहे असे वाटत असते. मात्र प्रत्यक्षात ती महिला या त्या व्यक्तीच्या मागे उभ्या असलेल्या माणसाकडे जाते आणि त्याला मिठी मारते. विवेक ओबेरॉयने हे GIF शेअर केलं असून न्यूझीलंडविरोधातल्या सामन्यात भारतीय चाहत्यांची अवस्था नेमकी अशीच झाली असे म्हटले आहे. त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यानंतर नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

काही नेटकऱ्यांनी याच GIF ला उत्तर देताना ऐश्वर्यानेही तुझ्यासोबत हेच केले असे म्हणून ती खळाळून हसतानाचे GIF शेअर केले आहे. तर काही नेटकऱ्यांनी विवेक ओबेरॉयला कुणीतरी काम द्या म्हणजे तो असले प्रकार बंद करेल असं म्हणत त्याची खिल्ली उडवली आहे.

याआधीही विवेक ओबेरॉयने एक्झिट पोल्सबाबत एक ट्विट केले होते. त्यात त्याने सलमान खान, ऐश्वर्या राय यांचाही फोटो वापरला होता. यावरून त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. ते प्रकरण कुठे शांत होते ना होते तोच विवेकने पुन्हा एकदा टीम इंडियाच्या पराभवाबाबत एक GIF शेअर केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2019 7:08 am

Web Title: actor vivek oberoi shared funny gif on team india and got trolled scj 81
Next Stories
1 wimbledon 2019 : सेरेनाचे २४व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाचे ध्येय!
2 फ्री हिट : @२०५१ विश्वचषक
3 थेट इंग्लंडमधून : आनंदाचे डोही, क्रिकेट तरंग..
Just Now!
X