24 January 2019

News Flash

लग्नाच्या ३ आठवड्यांपूर्वी जॉन सिनाने मोडले लग्न, ६ वर्ष करत होता डेट

जॉनचे निकीवर नितांत प्रेम होते. या जोडीची चर्चा फक्त रेसलिंग जगतातच नाही तर हॉलिवूडमध्येही होती. दोघांचे ५ मे रोजी लग्न होणार होते

जॉन सिना आणि निकी बेला

२०१८ मध्ये हॉलिवूडच्या अजून एका हॉट कपलचे ब्रेकअप झाले आहे. प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता आणि रेसलर जॉन सिनाने त्याची नियोजीत वधू निकी बेलासोबत होणारे लग्न मोडले आहे. अवघ्या ३ आठवड्यांवर आलेले लग्न जॉनने मोडले आहे. गेल्या ६ वर्षांपासून ते दोघं डेट करत होते. यूएस वीकलीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, जॉन आणि निकी दोघांनीही ब्रेकअप झाल्याची कबुली दिली आहे. जॉन म्हणाला की, आम्हा दोघांसाठी हा निर्णय फार कठीण होता. वेगळे झालो तरी आम्ही नेहमीच एकमेकांवर प्रेम करु आणि सन्मान करु. आयुष्याच्या या कठीण प्रसंगी आम्हाला एकटं सोडा.

जॉन आणि निकी २०१२ पासून एकमेकांना डेट करत होते. २०१७ मध्ये त्यांचा साखरपुडाही झाला होता. जॉनने निकीला रसलमेनिया ३३ च्या व्यासपिठावरच प्रपोज केले होते. काही दिवसांपूर्वी जॉनने एका मुलाखतीत म्हटले होते की, कोणतेही नाते टिकवण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते. रिलेशनशिप फार कठीण गोष्ट आहे. प्रेम करणं वाटतं तितकं सोपं नसते. पण तरीही प्रेम ही भावनाच फार सुंदर आहे. ५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर आम्हाला कळलं की प्रेम करणं सोपं नसतं.

इतर जोडप्यांप्रमाणे आमच्या नात्यानेही अनेक चढ- उतार पाहिले. जेव्हा मी निराश असतो तेव्हा वाटतं की मी निकीशिवाय राहू शकत नाही. पण कधी आम्ही महिनों महिने भेटतही नाही. जॉन आणि निकीचे ५ मे रोजी लग्न होणार होते. चाहते त्यांच्या आवडच्या जोडीचे लग्न पाहण्यासाठी आतूर झाले होते. पण लग्नाच्या २० दिवस आधीच दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे दोघांच्याही चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. जॉनचे निकीवर नितांत प्रेम होते. या जोडीची चर्चा फक्त रेसलिंग जगतातच नाही तर हॉलिवूडमध्येही होती. जॉन अनेकदा त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दोघांचे फोटो शेअर करायचा.

First Published on April 17, 2018 11:45 am

Web Title: actor wrestler john cena and nikki bella breakup 3 weeks before wedding know reason