03 June 2020

News Flash

‘या’ गोष्टी करोनाशी लढायला मदत करतात, करोनाग्रस्त अभिनेत्रीचा खुलासा

तिने सोशल मीडियापोस्टद्वारे ही माहिती दिली आहे

बॉलिवूड अभिनेत्री झोया मोरानी हिची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. तिच्या पाठोपाठ तिचे वडिल चित्रपट निर्माते करिम मोरानी आणि बहिण शाजा मोरानी यांना देखील करोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे आता चित्रपटसृष्टीमध्ये खबळबळ उडाली आहे. सध्या झोयावर उपचार सुरु असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना करोना विषयी सांगत असल्याचे दिसत आहे.

नुकताच झोयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये तिला स्वत:मध्ये करोनाची कोणती लक्षणे जाणवली आणि कोणत्या गोष्टी करोनाशी लढण्यासाठी मदत करतात याचा खुलासा केला आहे. ‘माझे वडिल, बहिण आणि माझी करोना चाचणी पॉझिटीव्ह आली. वडिल आणि शाजामध्ये करोना झाल्यानंतर कोणतीही लक्षणे दिसली नाही. पण माझ्यामध्ये करोनाची काही लक्षणे आढळली. त्यामुळे मी लवकरच माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जेणेकरुन तुम्हालाही त्याबद्दल थोडी माहिती मिळेल’ असे तिने पोस्टमध्ये लिहिले.

‘मला सरुवातीला थोडा ताप आल्यासारखे वाटत होते. तसेच छातीमध्येही दुखत होते. जर तुम्ही थोडा आराम केलात तर सहजपणे दुखणे कमी होते. प्राणायम आणि गरमपाणी मला करोनाशी लढण्यास खूप मदत करत आहेत. मी तुमच्यासोबत माझा अनुभव लवकरच शेअर करेन’ असे तिने पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करुन काळजी घेण्यास सांगितले आहे.

सध्या झोयावर कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर तिची बहिण शाजाला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांचे वडिल करिम मोरानी यांना देखील काल रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. करिम यांचे वय ६० वर्षे असून ते हार्ट पेशंट असल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना काळजी वाटत आहे.

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शाजा श्रीलंकेहून परतली होती. मात्र तिच्यात करोनाची कोणतीच लक्षणे दिसून आली नव्हती. पण आता तिची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. तर झोया मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राजस्थानहून परतली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2020 5:19 pm

Web Title: actor zoa morani shares her coronavirus symptoms treatment avb 95
Next Stories
1 Coronavirus : क्वारंटाइन रुग्णांसाठी आपलं हॉटेल देण्याचा ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याचा निर्णय
2 ‘फास्ट अँड फ्युरियस’चा नायक पुन्हा एकदा चर्चेत; मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
3 Video : क्वारंटाइनमध्ये तारक मेहता…मधला अय्यर काय करतोय पाहा
Just Now!
X