News Flash

काम चालू, मॅच बंद..!

क्रिकेट हा फक्त खेळ नाही तर भारतीयांचा तो धर्म आहे, अशा शब्दांत इथल्या क्रिकेटवेडाचं वर्णन केलं जातं.

| February 15, 2015 04:09 am

काम चालू, मॅच बंद..!

क्रिकेट हा फक्त खेळ नाही तर भारतीयांचा तो धर्म आहे, अशा शब्दांत इथल्या क्रिकेटवेडाचं वर्णन केलं जातं. भारत-पाकिस्तान सामन्याच्या वेळी देव पाण्यात ठेवण्यापासून ते विश्वचषकासाठीचे सामने पाहताना शकुन-अपशकुनाच्या प्रत्येक बाबी काटेकोरपणे पाळण्यापर्यंत सर्व गोष्टी नेमाने करणारा भारतीय क्रिकेटप्रेमी घराघरांत पाहायला मिळतो. याला आपले लाडके टीव्ही आणि चित्रपट कलाकारसुद्धा अपवाद नाहीत. पडद्यामागे हे कलाकारही क्रिकेटचे आणि भारतीय क्रिकेटवीरांचे निस्सिम भक्त आहेत. त्यामुळे यंदाही त्यांना विश्वचषकाची उत्सुकता आहे. पण सध्या दररोज १४ ते १६ तास चित्रीकरणात अडकून पडलेल्या कलाकारांना हे सामने पाहण्यासाठी वेळच नाही आहे. एकतर हे सामने पहाटे ३.३० ला दाखवण्यात येणार आहेत. त्यामुळे इतक्या पहाटे घरी झोपमोड करून हे सामने बघणे त्यांना परवडणारे नाही. म्हणूनच विश्वचषक सामने की चित्रीकरण या द्वंद्वात न अडकता कलाकारांनी सामन्यांवर काट मारत कामाला पहिली पसंती दिली आहे.

मालिकेच्या सेटवरच एक विश्वचषक चालू आहे.
मी क्रिकेटचा खूप मोठा चाहता आहे. मला क्रिकेट फक्त पाहायलाच आवडत नाही तर मी स्वत: क्रिकेट खेळतोही. त्यामुळे विश्वचषकाचे सामने म्हणजे माझ्यासारख्या क्रिकेटप्रेमीसाठी पर्वणीच असते. पण आमची ‘अशोका’ मालिका आताच सुरू झाली आहे. त्यामुळे मालिकेचे चित्रीकरण अतिशय वेगाने सुरू आहे. चित्रीकरणही मुंबईच्या बाहेर सुरू आहे. सध्या चित्रीकरणाच्या ठिकाणची सर्वाची धावपळ पाहता, आमच्या सेटवर एक वेगळेच विश्वचषक सुरू झाले आहे असे म्हणायला हरकत नाही. चौदा तास घरापासून दूर चित्रीकरण करत असतो. अशा परिस्थितीमध्ये क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी वेळ काढणे कठीणच आहे. मोबाइलवरून माहिती मिळेल. अगदी शक्य झाले तर सामन्यांचे पुन:प्रक्षेपण बघण्याचा प्रयत्न करेन.  
समीर धर्माधिकारी,  अशोका -कलर्स

अ‍ॅप्समुळे टीव्हीवर मॅच पाहण्याची उत्सुकता संपली
खरं सांगायचं झालं तर क्रिकेट या खेळाचा मी विशेष चाहता नाही. पण या खेळानिमित्ताने आमच्या घरी rv03मैफील जमायची. इथेही मित्रांसोबत मस्त धमाल करत आम्ही क्रिकेटचा आनंद घेतो. हे स्पिरिट मला फार आवडतं. त्यामुळे या खेळाची मी उत्सुकतेने वाट पाहात असतो. यंदाचे सामने सकाळी आहेत. त्यामुळे सर्व सामने पाहता येणार नाहीत. पण आमच्या सेटवर क्रिकेटचे वेडे आहेत. ते सामने पाहण्यासाठी काही ना काही जुगाड करणारच. त्यामुळे मला विशेष प्रयत्न करण्याची गरज नाही. सध्या मोबाइलवर विविध अ‍ॅप्सवर सामने पाहायला मिळतात. त्यामुळे टीव्हीवर लाइव्ह सामने पाहण्याची उत्सुकता संपली आहे.  
रवी दुबे,  जमाईराजा, झी टीव्ही

मित्रांकडून सामन्यांची माहिती मिळविन
सध्या मी माझ्या नव्या मालिकेच्या चित्रीकरणात आणि प्रसिद्धी कार्यक्रमांत व्यग्र आहे. नवीन वाहिनी rv04असल्यामुळे सध्या प्रसिद्धी कार्यक्रमांनी जोर धरला असल्याने इच्छा असूनही विश्वचषकाचे सामने मला पाहता येणार नाहीत. मी खरं तर क्रिकेटचा चाहता आहे. आपल्या संघाचे सामने मी न चुकता पाहतो. पण यंदा नव्या मालिकेमुळे मला सामन्यांची मजा लुटता येणार नाही. त्यामुळे माझ्या मित्रांकडून किंवा घरच्यांकडून सामन्यांची वेळोवेळी माहिती मिळाली तर घेत राहीन. संधी मिळाली तर एखाद्दुसरा सामना पाहीन.
हितेन तेजवानी, गंगा – अँड टीव्ही

लाइव्ह मॅच पाहण्याची गरज नाही
क्रिकेट खेळ मला खेळायला आवडतो, पण तासन्तास बसून पाहायला मला फारसं आवडत नाही. संपूर्ण rv05सामना पाहण्यापेक्षा सचिनची फलंदाजी किंवा सामन्याचे निर्णायक क्षण असे काही क्षण मी चुकवत नाही. विशेषत: भारत-पाकिस्तान सामना मी कधीच चुकवत नाही. आमचं चित्रीकरण म्हणजेच एक रोजचा सामना असतो. रोजच्या रोज एपिसोड्स पाठवणे म्हणजे एक तारेवरची कसरत असते. त्यामुळेक्रिकेट बघणं शक्य नाही. सेटवरही तसं फारसं वातावरण नाही. पण हल्ली मोबाइलवर सतत माहिती मिळत असते, त्यामुळे प्रत्यक्ष सामना पाहण्याची फार गरज वाटत नाही.
अनास रशिद , दिया और बाती-स्टार प्लस

सुट्टी असेल तर घरी मैफील जमेल
भारतात राहणारा प्रत्येकजण मग तो काश्मीरचा असो किंवा कन्याकुमारीचा, तो क्रिकेटचा चाहता असतोच. rv06विशेषत: भारत-पाकिस्तान सामना म्हणजे आपल्याकडे सणच असतो. मीसुद्धा क्रिकेटचा निस्सिम चाहता आहे. पण क्रिकेटसाठी चित्रीकरणाला रजा देणे किंवा वेळांची अदलाबदल करणे हे मला अजिबात पटत नाही. कारण आपलं काम आपल्या जागी असतं आणि खेळ एका जागी. त्यामुळे कामाला रजा नाही. भारत-पाकिस्तान सामना रविवारी रंगणार असल्याने त्यावेळी मात्र घरी मैफील रंगेल. बाकी पाहू जशी सुट्टी मिळेल तसे सामने पाहायचे.
शक्ती आनंद ,  महाराणा प्रताप -सोनी

विश्वचषकाची गंमत फक्त मोबाइलवरच
क्रिकेट हा खेळ कोणत्याही भारतीयाप्रमाणे माझा जीव की प्राण आहे. त्यामुळे विश्वचषक म्हणजे rv07माझ्यासाठी खूप मोठा सोहळा आहे. पण गेले वर्षभर कामाच्या व्यापामुळे मला क्रिकेटवर फारसे लक्ष देता आले नाही. यंदा वर्ल्डकप सुरू होण्याआधी मला यावेळचे संघ, खेळाडू यांचा माझा अभ्यास पक्का करायचा आहे, असं ठरवून तयारी तर करतो आहे. पण दुर्दैवाने चित्रीकरणामुळे मला सामने पाहता येणार नाहीत. त्यामुळे विश्वचषकाची गंमत फक्त मोबाइलवरच अनुभवता येणार आहे. त्यावरच सर्व सामन्यांची वेळोवेळी माहिती घेणं मी चुकवणार नाही.
अनुप सोनी , क्राईम पेट्रोल. सोनी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2015 4:09 am

Web Title: actors on cricket world cup
टॅग : Cricket World Cup
Next Stories
1 ‘साधु आगाशे’चं काय झालं?
2 सीमाप्रश्नाचे बुडबुडे आणि नीरव शांतता!
3 नेत्रसुखद प्रेमकथा
Just Now!
X