News Flash

PHOTOS : ‘कॉमेडी क्वीन’च्या लग्नाची लगबग सुरु

'भारती की बारात'

भारती सिंग

‘कॉमेडी क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारती सिंगच्या लग्नासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. तिच्या लग्नाच्या तयारीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. लग्नापूर्वी मित्रमंडळींसोबत पार्टी करणारी आणि प्री वेडिंग फोटोशूटमध्ये व्यग्र असणारी कॉमेडी क्वीन आता हळहळू नववधूच्या रुपात येऊ लागली आहे. हर्ष लिंबाचियासोबत भारती तीन डिसेंबरला विवाहबद्ध होणार असून, नुकत्याच लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे.

अभिनेत्री अनिता हसनंदानी, अदा खान, मोनालिसा अंतरा, जिया मानेक या टेलिव्हिजन अभिनेत्रींच्या उपस्थितीत भारतीच्या हातात चुडा भरण्याचा विधी नुकताच पार पडला. अतिशय पारंपरिक पद्धतीत पार पडलेल्या या सोहळ्याचे काही फोटो भारतीच्या या सेलिब्रिटी मैत्रिणींनी सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यासोबतच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षावही केला. यावेळी भारतीने लाल रंगाचा ड्रेस घातला होता. आनंद आणि उत्साहामुळे तिचा चेहरा आणखीन खुलून दिसत होता. भारतीच्या लग्नसोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी सध्या कलाविश्वातील बऱ्याच कलाकारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या या ‘कॉमेडी क्वीन’च्या आयुष्यात आलेले हे वळण तिच्यासाठी आनंददायी ठरो अशीच प्रतिक्रिया तिच्या काही कलाकार मित्रांनी दिली.

तीन डिसेंबरला गोव्यात भारती आणि हर्षचा डेस्टिनेशन वेडिंग सोहळा पार पडणार आहे. ‘भारती की बारात’ या थीमसह जवळपास तीन दिवस हा विवाहसोहळा रंगणार आहे. पूल पार्टीने या रंगतदार सोहळ्याची सुरुवात होणार असून, कॉकटेल पार्टी, संगीत, हळद, लग्नसोहळा आणि रिसेप्शन अशा कार्यक्रमांमध्ये भारती-हर्षचा लग्नसोहळा रंगेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 4:21 pm

Web Title: actress adaa khan and anita hassanandani shower love on comedian bharti singh at her bangle ceremony inside photos
Next Stories
1 ‘या’ तारखेला प्रदर्शित होणार ‘पद्मावती’?
2 ‘गोष्टी बदलू लागल्यात’, ‘त्या’ निर्णयाचे मानुषीनेही केले समर्थन
3 दुसऱ्या बाळासाठी राणी मुखर्जीचे प्लॅनिंग सुरू
Just Now!
X