News Flash

Photo : ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीने केलं बाथटबमध्ये टॉपलेस फोटोशूट

यापूर्वीही ती एका न्यूड सीनमुळे चर्चेत आली होती

काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य अभिनेत्री अमला पॉल एका तामिळ चित्रपटातील न्यूड सीनमुळे चर्चेत आली होती. तिने ”आदाई” या चित्रपटामध्ये एक न्यूड सीन दिला होता. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर यामध्ये अमला न्यूड सीनमध्ये दिसून आली होती. त्यानंतर या दृश्यावर अनेकांनी आक्षेप नोंदवला होता. इतकंच नाही तर याची चर्चा राजकीय वर्तुळातही रंगली होती. मात्र या साऱ्या प्रकारानंतर अमलाने पुन्हा एकदा हॉट फोटोशूट केलं असून यावेळी तिने बाथटबमधील टॉपलेस फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अमलाने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला असून सध्या ती प्रियकरासोबत बालीमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. येथील अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअरदेखील केले आहेत. या फोटोमध्येच तिने बाथटबमधील एक टॉपलेस फोटो शेअर केला आहे. त्यामुळे सध्या तिच्या या फोटोची चाहत्यांमध्ये कमालीची चर्चा रंगली आहे.

वाचा : आमिरमुळे जुहीने गमावला ‘राजा हिंदुस्थानी’

अमलाने बॅकसाइड टॉपलेस फोटो शेअर केला आहे. ज्यात ती टॅटू फ्लॉन्ट करताना दिसत आहे. या फोटोसोबतच तिने आणखीन एक फोटो शेअर केला आहे. दरम्यान, अमला कायम तिच्या हटके फोटोशूटमुळे चर्चेत येत असते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2019 12:08 pm

Web Title: actress amala paul bathtub bali topless pics viral ssj 93
Next Stories
1 अक्षयकुमारनं मानधन वाढवल्याची चर्चा; आकडा ऐकून बसेल धक्का!
2 आमिरमुळे जुहीने गमावला ‘राजा हिंदुस्थानी’
3 ‘शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या KBCवर बहिष्कार टाका’; #Boycott_KBC_SonyTv देशभरात ट्रेडिंग
Just Now!
X