28 January 2020

News Flash

हार्दिकला क्लीन बोल्ड करणाऱ्या नताशानं शेअर केला हॉट फोटो

अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. पण तो त्याच्या ‘लव्ह लाईफ’मुळे जोरदार चर्चेत आहे

गेले काही दिवस भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. पण तो त्याच्या ‘लव्ह लाईफ’मुळे जोरदार चर्चेत आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हार्दिक पांड्या सर्बियन अभिनेत्री आणि मॉडेल नताशा स्टॅन्कोविकसोबत साखरपुडा केला होता. हार्दिकने गुपचुप साखरपुडा उरकत चाहत्यांना सुखद धक्का दिला. हार्दिकनं दुबईमध्ये एका स्पीडबोटवर नताशाला प्रपोज करत लग्नाची मागणी घातली होती. साखरपुड्यानंतर हे लव्हबर्ड सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करत आहेत. नताशानं आपल्या इन्स्टाग्रामवर दोघांचा फोटो पोस्ट केला आहे.

नताशानं सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोवर नेटकरी कमेंट करत आहेत. या फोटोंमध्ये दोघेही बीच साइडवर उभे असल्याचं दिसत आहेत. नताशाने मोनोकिनी घातलेय तर हार्दिक शॉर्ट्स घातल्याचं फोटोवरून दिसतेय. दोघांनीही डोळ्यांवर काळ्या रंगाचा गॉगल चढवला आहे. या फोटोमध्ये दोघांनी एकमेकांच्या कमरेभोवती आपले हात ठेवले आहेत.

 

View this post on Instagram

 

#throwback @hardikpandya93

A post shared by Nataša Stanković (@natasastankovic__) on

नताशाने इन्स्टाग्रावर फोटो पोस्ट केल्यानंतर हार्दिकनेही कमेंटमध्ये हार्टची इमोजी टाकली आहे.

दरम्यान, नताशा ही अभिनेत्री, मॉडेल असून ती छोट्या पडद्यावरील बिग बॉसमध्येही झळकली होती. काही दिवसापूर्वी हार्दिकने नताशाला प्रपोज केलं. यावेळचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता. त्याने फोटो शेअर केल्यानंतर हार्दिक आणि नताशाचे नाते अधिकृत मानले जात आहे. ऑगस्ट २०१९ पासून हार्दिक आणि नताशाविषयीच्या चर्चांना उधाण आलं होतं.

First Published on January 15, 2020 2:48 pm

Web Title: actress and model natasa stankovic shared hot photo with hardik pandya nck 90
Next Stories
1 देवदत्त होणार डॉन!
2 जॉनने अर्शदला दिले सर्वात महागडे गिफ्ट
3 Video : उत्तम डान्सर कोण? प्रियांका-करीनाचा डान्स पाहून तुम्हीच ठरवा
Just Now!
X