21 January 2021

News Flash

‘माझा जोडीदार कुठेय?’ अंकिताने विचारला नेटकऱ्यांना प्रश्न

अंकिताचा प्रश्न पाहून चाहते झाले अचंबित

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजूपत यांच्यातील नातं साऱ्यांनाच ठावूक आहे. बरीच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ही जोडी विभक्त झाली. मात्र, सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याला न्याय मिळावा यासाठी ती सातत्याने प्रयत्न करत होती. यावरुनच अंकिता आणि सुशांत यांच्या ब्रेकअपनंतरही त्यांच्यातील मैत्री कायम होती हेच दिसून आलं. सध्या अंकिता विकी जैनला डेट करत आहे. अनेकदा ती विकीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. मात्र, यावेळी अंकिताने शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. ‘माझा जोडीदार कुठे आहे?’, असा प्रश्न अंकिताने विचारला आहे. तिचा हा प्रश्न पाहून अनेक जण चक्रावून गेल्याचं पाहायला मिळालं.

अंकिताने इन्स्टाग्रामवर एक क्वीज खेळला. या क्वीजमध्ये तिने चाहत्यांना काही प्रश्न विचारलं. यात ‘माझा जोडीदार कुठे आहे? ‘ असा प्रश्न विचारला. तिचा हा प्रश्न पाहून अनेक जण आवाक् झाले. तर काहींनी मजेशीर कमेंट्सदेखील केल्या. यामध्येच ‘सोलमेट वगैरे काही नसतं’, अशी कमेंट एका चाहत्याने केल्याचं पाहायला मिळालं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अंकिताने एक पोस्ट शेअर करत विकी जैनला तिचा सोलमेट, जोडीदार असल्याचं म्हटलं होतं. त्याचसोबत तिने एक डान्स प्रॉक्टिसचा व्हिडीओदेखील शेअर केला होता. या डान्स परफॉर्मन्सच्या माध्यमातून ती सुशांतला आदरांजली वाहणार असल्याचं तिने सांगितलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2020 4:11 pm

Web Title: actress ankita lokhande asks fans instagram where her soulmate ssj 93
Next Stories
1 राहुल रॉयच्या प्रकृतीमध्ये सुधारणा
2 ड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव
3 …म्हणून सखी म्हणते ‘अस्सं माहेर नको गं बाई’
Just Now!
X