बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला मुंबई महापालिकेने मोठा दिलासा दिला आहे. मुंबई महापालिकेने अनुष्का शर्माला बेकायदेशीर इलेक्ट्रीक बोर्डाप्रकरणी नोटीस बजावली होती. शेजाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर अनुष्का शर्माला ही नोटीस बजावण्यात आली होती. पण आता तिला महापालिकेने दिलासा दिला आहे.

मुंबईतील वर्सोवा भागात असलेल्या बद्रिनाथ टॉवर्समध्ये अनुष्का शर्मा २० व्या मजल्यावर राहते. संपूर्ण मजलाच शर्मा कुटुंबीयांच्या नावावर आहे. या इमारतीचे माजी सचिव सुनील बत्रा यांनी शर्मा कुटुंबीयांच्या घराबाहेरील बेकायदेशीर इलेक्ट्रीक बॉक्सवर आक्षेप घेतला होता. अनुष्काने मजल्याच्या पॅसेजमध्ये बेकायदेशीररित्या इलेक्ट्रीक बॉक्स लावल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते.

दिल्लीच्या जंतर मंतरवर झाली स्वामी ओमची धुलाई

पण आता संबंधित पॅसेज अनुष्का शर्माच्या मालकीचा असल्याचं स्थानिक वॉर्ड ऑफिसने तक्रारदाराला लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. अनुष्का ही सेलिब्रेटी असल्यामुळे तिला झुकतं माप दिल्याचा दावा आता बत्रा यांनी केलाय.

पालिका अधिकाऱ्यांनी परीक्षण केल्यानंतर संबंधित इलेक्ट्रीक बॉक्स आक्षेपार्ह असल्याचं सांगण्यात आलं होतं. शर्मा कुटुंबाने हा बॉक्स तात्काळ हटवावा, अशा सूचनाही पालिका अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. मात्र आता तो बॉक्स भिंतीवर लटकवलेला असल्याचं त्याच वॉर्ड ऑफिसने स्पष्ट केलंय. तो पॅसेज शर्मा कुटुंबाच्या मालकीचा असल्यामुळे बॉक्स त्यांच्या घरात असल्याप्रमाणे आहे, असंही पत्रात म्हटलं आहे.

बद्रिनाथ टॉवरमध्ये सोळावा आणि सतरावा मजला बत्रा यांच्या मालकीचा आहे. शर्मांनी बसवलेल्या इलेक्ट्रॉनिक बॉक्सविरोधात बत्रा यांनी आधी अग्निशमन विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर बत्रा यांना महापालिकेकडे तक्रार करण्यास अग्निशमन विभागाने सुचवलं होतं.

या खलनायकाला मिळायचे नायकांपेक्षा अधिक मानधन

बत्रांच्या तक्रारीनंतर महापालिकेने शर्मांना नोटीस बजावली होती. मात्र आपल्यावरील आरोप तथ्यहीन असल्याचा दावा अनुष्काने केला. आवश्यक त्या परवानग्या मिळाल्यानंतरच पॅसेजमध्ये इलेक्ट्रीक बॉक्स बसवल्याचा दावा अनुष्काने केला होता.