10 August 2020

News Flash

घरी राहून ‘मस्तानी’ करते अभ्यास? जाणून घ्या, दीपिका नेमकं काय शिकते

जाणून घ्या, दीपिका लॉकडाउनमध्ये नेमकं काय करते

दीपिका पदुकोण

नैना’, ‘मस्तानी’, ‘पद्मावती’, ‘लीला’ अशा विविध भूमिका साकारुन प्रेक्षकांसमोर आलेली अभिनेत्री म्हणजे दीपिका पदुकोण. सहजसुंदर अभिनय करुन दीपिकाने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांमुळे आज दीपिकाचा मोठा चाहता वर्ग आहे. एखादी भूमिका साकारताना दीपिका अथक प्रयत्न करते, हे तिच्या अभिनयातून दिसून येतं. सध्या लॉकडाउन असल्यामुळे सेलिब्रिटी जरी घरी असले तरीदेखील दीपिका मात्र या काळात तिच्या अभिनयावर लक्ष केंद्रित करताना दिसत आहे. घरी राहून सुद्धा दीपिका वेळात वेळ काढून ती आगामी चित्रपटांमधील भूमिकांचा अभ्यास करताना दिसत आहे.

दीपिका लवकरच शकुन बत्रा यांच्या आगामी चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे सध्या घरी राहून ती या चित्रपटाची स्क्रिप्ट वाचत आहे. तसंच या भूमिकेचा सतत अभ्यास करत आहे.

दीपिकाने तिचं दिवसाचं एक वेळापत्रक तयार केलं आहे. त्यात तिने या आगामी चित्रपटासाठी खास वेळ काढून ठेवला आहे. या वेळात ती स्क्रिप्टमधील काही पानं वाचते आणि त्याचा नियमितपणे अभ्यास करते. लॉकडाउन संपल्यानंतर लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे, असं दीपिकाच्या जवळच्या व्यक्तीने सांगितलं आहे.

दरम्यान, या चित्रपटाचं श्रीलंकेत चित्रीकरण होणार आहे. त्यामुळे दीपिकासह संपूर्ण टीम लॉकडाउन संपण्याची वाट पाहत आहेत. दीपिका ही कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिच्या प्रत्येक भूमिकेची प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक असल्याचं दिसून येतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 1:09 pm

Web Title: actress deepika padukon is busy preparing for her film amid lockdown ssj 93
टॅग Deepika Padukon
Next Stories
1 हॉटस्टारच्या वादात कंगना रनौतची उडी; विद्युत जामवालला दिला पाठिंबा
2 अक्षय कुमारने घराणेशाहीवर साधला निशाणा; मुलगा आरवला दिला सूचक इशारा, म्हणाला…
3 टिक-टॉक बॅनमुळे बेरोजगार झालेल्या कलाकारांचं काय होणार?; डेझी शाहला पडला प्रश्न
Just Now!
X