News Flash

रणबीर-आलियाच्या लग्नाविषयी दीपिकानं केला खुलासा

दीपिका ही रणबीरची पूर्वीश्रमीची प्रेयसी असली तरी आलिया आणि दीपिकात मैत्रीचं नात आहे

बॉलिवूडमधील बहुचर्चित जोडी अभिनेता रणबीर कपूर व अभिनेत्री आलिया भट यांच्या लग्नाविषयी बऱ्याच चर्चा ऐकू येत आहेत. या वर्षाअखेरीपर्यंत रणबीर-आलिया विवाहबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र या दोघांनीही लग्नाच्या मुद्द्यावर कोणताही खुलासा केलेला नाही. त्यामुळे ही जोडी नक्की कधी लग्न करणार असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. त्यातच अभिनेत्री दीपिका पदुकोणने मात्र एक सूचक वक्तव्य करुन ही जोडी लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं सांगितलं आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमामध्ये दीपिका पदुकोण आणि आलिया भट यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांच्यासोबत रणवीर सिंग आणि दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडादेखील उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये विजयला काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामध्येच ‘तुला कोणती बॉलिवूड अभिनेत्री आवडते’? असं विचारण्यात आलं. त्यानंतर त्याने पटकन दीपिका आणि आलियाचं नाव घेतलं. मात्र दीपिका त्वरीत म्हणाली की, “माझं तर लग्न झालं आणि आलियाचंही आता होणार आहे”. दीपिकाने आलियाच्या लग्नाविषयी हे वक्तव्य करुन अनेकांच्या नजरा या दोघींकडे वळल्या.


दीपिकाने केलेल्या या वक्तव्यामुळे आलिया लवकरच रणबीरसोबत लग्न करणार असल्याचं निश्चित झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे चाहते रणबीर-आलियाचं लग्न नक्की कधी होतं याकडे लक्ष लावून बसले आहेत.

 

View this post on Instagram

 

Cuppa koffee with this beauty @deepikapadukone

A post shared by Alia (@aliaabhatt) on


दरम्यान,दीपिका ही रणबीरची पूर्वीश्रमीची प्रेयसी असली तरी आलिया आणि दीपिकात मैत्रीचं नात आहे. दीपिका लवकरच ‘छपाक’ या चित्रपटात झळकणार आहे. तर आलिया आणि रणबीर ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 9:24 am

Web Title: actress deepika padukone gave a hint about alia bhatt and ranbir kapoor wedding latter gets shocked ssj 93
Next Stories
1 सुभाष चंद्रा यांचा ZEEच्या चेअरमनपदाचा राजीनामा
2 डिलिव्हरी बॉयवर भडकली गायिका; तोकड्या कपड्यांच्या टि्वटवर सडेतोड उत्तर
3 कंगना करणार राम मंदिरावरील चित्रपटाची निर्मिती
Just Now!
X