News Flash

दीपिका पदुकोण ठरली आशियातील सर्वात प्रभावशाली महिला

हा सन्मान मिळवणारी दीपिका ही पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे.

दीपिका पदुकोण ठरली आशियातील सर्वात प्रभावशाली महिला

बॉलिवूडची मस्तानी अर्थात दीपिका पदुकोण हिचं नाव कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं. फक्त देशात नाही तर संपूर्ण जगात तिने एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या दीपिकाने तिच्या अभिनयाच्या जोरावर भरपूर यश मिळवलं आहे. नुकतंच दीपिकाला आशियातील सर्वात प्रभावशाली महिला होण्याचा सन्मान मिळाला आहे. चित्रपट आणि टेलिव्हिजनवरील सर्वात प्रभावशाली महिला म्हणून तिला गौरवण्यात आले आहे. हा सन्मान मिळवणारी दीपिका ही पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे.

दीपिकाचा चाहता वर्ग फार मोठा आहे. यामुळे सर्वाधिक चाहतावर्ग असलेल्या सेलिब्रिटींच्या यादीत ती टॉप १०० मध्ये येते. सध्या दीपिकाचे इन्स्टाग्रमावर जवळपास ५९.८ मिलियन फॉलोअर्स आहेत. तर गुगलवरही ती नेहमीच ट्रेडींगवर पाहायला मिळते. दीपिकाच्या सर्वाधिक चाहत्यावर्गामुळे तिला आशियातील सर्वात प्रभावशाली महिला म्हणून निवडण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

दीपिकाने सिनेसृष्टीत पाऊल ठेवून तिला १३ वर्ष झाली आहेत. यादरम्यान तिने बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमध्ये तिची वेगळी छाप पाडली आहे. दीपिका ही अनेक ब्रँडच्या जाहिरातीत काम करते. दरम्यान, दीपिका तनिष्क, ओपो,नेस्ले फ्रूट व्हिला, लॉरिअल, रिलायन्स जियो, अ‍ॅक्सिस बँक, गुवार लाइटिंग नेसकॅफे, केलॉग्स, विस्तारा एअरलाईन्स,लक्स,जिलेट, ब्रिटानिया, गोआईबीबो या सारख्या बड्या ब्रॅण्डच्या जाहिरातींची ब्रँड अॅम्बेसेडर आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

दरम्यान, दीपिका रणवीरसोबत ’83’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. त्यानंतर दीपिका ‘पठाण’ आणि ‘फाइटर’, ‘द इंटर्न’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. दुसरीकडे, रणवीर सिंह ‘सर्कस’, ‘तख्त’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2021 6:23 pm

Web Title: actress deepika padukone is asia most influential woman in tv and film nrp 97
Next Stories
1 सैफने मुलगा जहांगीरबद्दल केलं असं वक्तव्य की कपिल शर्माला हसू झालं अनावर
2 Video : ‘जीने के है चार दिन’, सलमान खानचा भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल
3 विद्युत जामवाल आणि फॅशन डिझायनर नंदिता मेहताचा ‘कमांडो स्टाईल’ साखरपुडा
Just Now!
X