News Flash

ड्रग्स प्रकरण : रकुल प्रीत पाठोपाठ करिश्मा प्रकाशही चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल

२६ सप्टेंबरला होणार दीपिका पदुकोणची चौकशी

अभिनेत्री रकुल प्रीत सिंह पाठोपाठ करिश्मा प्रकाशदेखील चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे. करिश्मा प्रकाश अभिनेत्री दीपिका पदुकोणची मॅनेजर असून ड्रग्स प्रकरणात तिचंदेखील नाव समोर आलं आहे. त्यामुळे रकुल प्रीतसोबतच करिश्माचीदेखील एनसीबी चौकशी करणार आहे.

ड्रग्सप्रकरणी करिश्मा प्रकाशचं नाव आल्यामुळे बुधवारी एनसीबीने तिला समन्स बजावले होते. त्यानंतर शुक्रवारी (२५ सप्टेंबर) ती चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात हजर झाली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्सच्या अँगलबाबत एनसीबी तपास करत आहे. रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर या तपासात आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक मोठी नावं समोर आली. सुशांतची मॅनेजर जया साहाच्या चौकशीदरम्यान दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाशचंही नाव समोर आलं.

दरम्यान, एनसीबी सुशांतची एक्स मॅनेजर श्रुती मोदी आणि टॅलेंट मॅनेजर जया साहा यांची चौकशी करत आहे. जया साहाच्या चॅटमधून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची नावं उघड झाली आहेत. दीपिकाची मॅनेजर करिश्मा आणि जया यांच्यातदेखील ड्रग्सविषयी बोलणं झाल्याचं चॅटमधून उघडकीस आल्याचं म्हटलं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2020 12:04 pm

Web Title: actress deepika padukones manager karishma prakash arrives at ncb sit office ssj 93
Next Stories
1 ‘हॉण्टेड 3D’फेम अभिनेत्रीने केली ड्रग्स टेस्ट; रिपोर्ट आल्यावर म्हणाली…
2 ‘इश्क में मरजावां 2’फेम अभिनेता करोना पॉझिटिव्ह
3 एस.पी. बालसुब्रमण्यम लाइफ सपोर्टवर; प्रकृती गंभीर
Just Now!
X