परदेशातून मुंबईमध्ये आलेला नचिकेत आणि मुंबईतल्या एका मध्यमवर्गीय घरामध्ये वाढलेली संस्कारी सई यांची साधी सरळ प्रेमकथा म्हणजे झी युवा वाहिनीवरची ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण ही मालिका. परस्पर विरुद्ध दोन टोकांच्या वातावरणामध्ये वाढलेल्या या दोघांमध्ये तयार होणारी मैत्री, आकर्षण आणि त्यानंतरचं त्यांचं प्रेम या अनुशंघाने मालिकेची कथा उलगडताना दिसते. अल्पावधीतच लोकप्रियतेचं शिखर गाठलेल्या या मालिकेतील प्रमुख कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मालिकेतील प्रमुख अभिनेत्री गौरी कुलकर्णी ही २०२१ या नवीन वर्षात सर्व इच्छा आकांशा पूर्ण करताना दिसतेय. गौरीने नुकतीच एक नवीन गाडी घेतली आहे. तिने या नवीन गाडीचे स्वागत करतानाचे फोटो चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या नवीन गाडीचे स्वागत करताना गौरीचा आनंद गगनात मावत नव्हता. तिने गाडी सोबतचा फोटो ‘एक नवीन सदस्य’ असं कॅप्शन लिहून पोस्ट केला आहे.

ही गाडी घेणे हे गौरीचं स्वप्न होतं त्यामुळे या स्वप्नपूर्तीच्या क्षणी गौरी थोडी भावनिक झाली तसंच तिला अभिमान देखील वटतोय. चाहत्यांसोबतच गौरीचा मित्रपरिवार आणि सहकलाकार या आनंदाच्या क्षणी तिचं अभिनंदन करत कौतुक करताना दिसत आहेत. ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण मालिकेत गौरीचे सहकलाकार प्रिया मराठे, तेजस बर्वे यांनी देखील तिला अभिनंदन करून नवीन गाडीतून राईड कधी मिळणार? असं विचारलंय त्यावर गौरीने लवकरच असं म्हंटल आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress gauri kulkarni buy new car avb
First published on: 28-01-2021 at 16:29 IST