बॉलीवूड असो वा मराठी चित्रपट सृष्टी या दोन्ही मधील एक मोठ साम्य म्हणजे येथे भविष्य आणि अंकशास्त्र याला खूप महत्व आहे. चित्रपटाचा मुहूर्त, नाव, प्रदर्शनाची तारीख हे सुद्धा अनेकदा पंडितांच्या आधारे ठरविले जाते. तर अनेक अभिनेता, अभिनेत्री आपले नाव देखील याच शास्त्रांचा विचार करून बदलले आणि त्यांना यश ही प्राप्त झाले आहे.
आपल्याला चिंगी, पाच नार एक बेजार, उचला रे उचला अशा मराठी चित्रपटांमधून तसेच दिया और बाती हम, हिटलर दीदी, किस्मत कि लकीरे आणि दो हंसो का जोडा या हिंदी टीव्ही शोमधून आपल्याला पाहायला मिळालेली हर्षाली झिने या अभिनेत्रीने नुकतेच आपले नाव बदलून करोल झिने केले आहे. याबद्दल तिला विचारले असता करोल या शब्दाचा जर्मन तसेच स्पॅनिश भाषेतील अर्थ बलवान आणि स्वतंत्र असा होतो व ते माझ्या स्वभावाला साजेसं असल्याचं तिने सांगितले. त्याचसोबत भविष्य, अंकशास्त्र यामध्ये देखील मोठ परिवर्तन घडविण्याची ताकद असते आणि त्यावर माझा विश्वास आहे असेही ती म्हणाली.
आपल्या आगामी चित्रपटात ‘भविष्याची ऐशी तैशी’ असे जरी करोल बोलत असली तरी भविष्याचा आधार घेऊनच तीची पुढील वाटचाल होणार आहे हे नक्की