News Flash

अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांची करोनावर मात

सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती

लॉकडाउननंतर छोट्या पडद्यावरील अनेक मालिका आणि बॉलिवूड चित्रपटांचे चित्रीकरण पुन्हा सुरु झाले आहे. पण चित्रीकरण सुरु होताच सेटवर क्रू मेंबर्ससह अनेक कलाकरांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले. यामध्ये हप्पू की उलटन पलटन या मालिकेतील अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांना देखील करोनाची लागण झाली होती. पण आता त्या करोनावर मात करुन घरी परतल्या आहेत.

नुकताच हिमानी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हॉस्पिटलमध्ये मदत करणाऱ्या स्टाफचे आभार मानले आहेत. ‘आपले कोविड वॉरिअर्स, हॉस्पिटलमधील स्टाफचे खरच आभार. मी पुन्हा होम क्वारंटाइन झाले आहे. तुम्हा सर्वांच्या सकारात्मक शुभेच्छांसाठी धन्यवाद’ असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A big thank you to our Covid warriors,the hospital staff,am back in home quarantine!Thank you all for your positive wishes.

A post shared by Himani Shivpuri (@hshivpuri) on

यापूर्वी त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे करोना झाल्याचे सांगितले होते. ‘शुभ सकाळ! माझी करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. जे कोणी माझ्या संपर्कात आले कृपया त्यांनी करोना चाचणी करुन घ्या’ असे म्हणत हिमानी यांनी विनंती केली होती. तसेच त्यांना मुंबईमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता हिमानी यांनी करोनावर मात केली असून त्या घरी परतल्या आहेत.

देशाचा रिकव्हरी रेट ७९.६८ टक्क्यांवर
देशात एकीकडे दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढत असला, तरी देखील दुसरीकडे करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत असल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. देशाचा रिकव्हरी रेट(बरे होणाऱ्यांचे प्रमाण) ७९.६८ टक्क्यांवर पोहचला आहे. मागील २४ तासांत देशभरात ९४ हजार ६१२ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. देशात आजपर्यंत करोनामुक्त झालेल्यांच्या संख्येने आता ४३ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. शिवाय, मागील सलग दोन दिवस ९४ हजारांपेक्षा अधिकजणांनी करोनावर मात केलेली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2020 7:53 pm

Web Title: actress himani shivpuri discharged from hospital avb 95
Next Stories
1 उत्तर प्रदेश सरकार उभारणार सर्वात मोठी फिल्मसिटी, योगी आदित्यनाथांची घोषणा
2 हर्ष गोयंकांनी केले जगातील सुंदर महिलांशी संबंधित ट्विट, अभिषेक बच्चनने दिले उत्तर
3 “कुणीही तुम्हाला जबरदस्तीनं ड्रग्ज देऊ शकत नाही; याचं मुंबईशी काही घेणंदेणं नाही”
Just Now!
X