अभिनेत्री,होस्ट शिबानी दांडेकर सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. शिबानी दांडेकर आणि तिचा बॉयफ्रेंड अभिनेता फरहान अख्तर बऱ्याच काळापासून रिलेशनशीपमध्ये आहेत. ते सध्या लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहात आहेत. आता त्यांच्या चाहत्यांना ते लग्न कधी करणार? असा प्रश्न पडल्याचे दिसून येत आहे.  या प्रश्नावर आता शिबानीने आपलं मत मांडले आहे. या लॉकडउनच्या दरम्यान अमचे नाते अजुन उमलले असे तिने एका मुलाखतीत सांगितले आहे.

शिबानी ‘बॉलिवूड बबल’ला मुलाखत देताना म्हणाली की,”मला सगळे हाच प्रश्न विचारत आहेत की मी लग्न कधी करणार? खरं सांगायचे झाले तर अजून या बद्दल आमच्यात काही बोलणे झाले नाही. आम्ही ठरवल्यावर नक्की तुम्हाला सांगू. पण आत्ता असा काहीच विचार नाही.” शिबानी त्यांच्यातील नात्या बद्दल सांगताना म्हणाली की, “या लॉकडाउनमध्ये आमच नात अजून उमले आहे……..आम्ही एकमेकांना जास्त लवकर ओळखू लागलो. जे एरवी शक्य झाले नसते. कामाला जाणे, वर्कआउट करणे, चित्रपट बघणे या सगळ्या गोष्टी आम्ही एकत्र करतो. आमच्यात बऱ्याच गोष्टी सेम आहेत आणि सध्या आमच जे चालं आहे ते मस्तं आहे.” त्यामुळे लग्ना बद्दलं अजुन विचार केला नाही असे शिबानीने सांगितले आहे.

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर गेले तिन वर्ष रिलेशनशीपमध्ये आहेत. याअधी फरहान अख्तरचं लग्न अधुना भाबानीशी झाले होते, त्या दोघांना दोन मुली आहेत. कामाच्या बाबतीत बोल्याचे झाले तर शिबानीच काही प्रोजेक्टसवर काम सुरू आहे. तर फरहानला आपण ‘तूफान’या चित्रपटात प्रमुख भुमिका साकारताना पाहिले आहे. त्या चित्रपटातील त्याचा अभिनय प्रक्षकांना प्रचंड आवडला आहे.