अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या धक्क्याने अजून इंडस्ट्री सावरली नसताना आणखी एका अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित आत्महत्येचे संकेत दिले. कन्नड अभिनेत्री जयश्री रामैय्या हिने फेसबुकवरील पोस्टमध्ये ‘I Quit, Goodbye to This World and depression’ (या जगाला आणि नैराश्याला गुडबाय) असं लिहिलं. तिच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर एकच खळबळ माजली. तिच्या काही मित्रांनी ही पोस्ट पाहून लगेच तिच्या घराकडे धाव घेतली. या पोस्टचे गांभीर्य लक्षात येताच थोड्या वेळाने जयश्रीने ही पोस्ट डिलीट केली.
आधीची पोस्ट डिलीट केल्यानंतर जयश्रीने नवीन पोस्ट लिहिली. ‘मी ठीक आणि सुरक्षित आहे. सर्वांना माझं प्रेम’, असं तिने नव्या पोस्टमध्ये लिहिलं. गेल्या काही काळापासून जयश्री नैराश्यात असल्याचं तिची मैत्रीण व अभिनेत्री अद्विती शेट्टीने सांगितलं. ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत अद्विती म्हणाली, “घरातील वाद आणि काम मिळत नसल्यामुळे ती तणावात आहे. तिच्या नैराश्याबद्दल तिने अनेकदा मला सांगितलं आणि प्रत्येक वेळी मी तिला समजावलं. पण ती तिचा फोन नंबर सारखा बदलते आणि त्यामुळे तिच्यावर लक्ष ठेवणं कठीण होतं.”
आणखी वाचा : “‘त्या’ चुकीसाठी मी कंगनाची माफी मागितली पण..”; अनुराग कश्यपने सांगितला जुना किस्सा
जयश्रीने मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली. कन्नड बिग बॉसच्या तिसऱ्या सिझनमध्येही ही स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. जयश्रीची ही पोस्ट पब्लिसिटी स्टंट असल्याचंही अनेक नेटकरी म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 23, 2020 10:40 am