25 February 2021

News Flash

ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयानंतर करिश्माने विकलं घर

...म्हणून करिश्मा कपूरने विकलं घर

आपल्या हक्काचं, स्वत:चं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. मग तो सामान्य व्यक्ती असो किंवा सेलिब्रिटी. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी नवीन घर खरेदी केलं आहे. मात्र, यात एका अभिनेत्री घर खरेदी करण्याऐवजी चक्क तिचं घर विकलं आहे. विशेष म्हणजे हे घर विकण्यामागे एक खास कारण असल्याचं सांगण्यात येत आहे.

करिश्मा कपूरचा कलाविश्वातील वावर आता पूर्वी सारखा राहिलेला नाही. मात्र, तरीदेखील ती या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. त्यातच आता तिने तिचं घर विकलं आहे. विशेष म्हणजे ठाकरे सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे तिला हे घर विकणं सोईस्कर ठरल्याचं म्हटलं जात आहे. ठाकरे सरकारने फ्लॅट मुद्रांक शुल्कात कपात केल्यानंतर करिश्माने हे घर विकल्याचं म्हटलं जात आहे.b

वाचा : विद्या बालनचा ‘नटखट’ ऑस्करच्या शर्यतीत

करिश्मा कपूरने तिचा मुंबईतील खार परिसरातील फ्लॅट विकला आहे. तब्बल १०.११ कोटी रुपयांना हा फ्लॅट विकल्याचं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकारने रिअल इस्टेट क्षेत्राला चालना देण्यासाठी अलिकडेच मुद्रांक शुल्कात कपात करण्याचं जाहीर केले आहे. याच संधीचा फायदा घेत करिश्माने तिचं घर विकलं आहे. २० डिसेंबर रोजी या घराची नोंद झाली होती.

वाचा : स्वस्तात मस्त! विद्या बालनच्या ‘या’ साडीची किंमत आहे तुमच्याही आवाक्यात

सूत्रांच्या माहितीनुसार, करिश्माने तिच्या मालमत्तेवर २०.२२ लाख रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे. करिश्माचं हे घर आभा दमानी यांनी खरेदी केल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे करिश्मा कलाविश्वापासून दूर गेली आहे. मात्र, आजही तिच्या लक्झरी लाइफस्टाइलची चाहत्यांमध्ये कायम चर्चा रंगते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2021 11:40 am

Web Title: actress karishma kapoor sold her flat in mumbai for rs 10 11 crore ssj 93
Next Stories
1 विद्या बालनचा ‘नटखट’ ऑस्करच्या शर्यतीत
2 स्वस्तात मस्त! विद्या बालनच्या ‘या’ साडीची किंमत आहे तुमच्याही आवाक्यात
3 ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ प्रदर्शनापूर्वीच वादात; ‘त्या’ पोस्टरप्रकरणी रिचाने मागितली माफी
Just Now!
X