News Flash

विकी कौशल पाठोपाठ अभिनेत्री कतरिना कैफला देखील करोनाचा संसर्ग

सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती..

राज्यात करोना संसर्ग अधिकच झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत असून, मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. अगदी सर्वसामान्य नागरिकांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वचजण करोनाच्या विळख्यात सापडत आहेत. अभिनेता विकी कौशल पाठोपाठ आता अभिनेत्री कतरिना कैफला देखील करोनाचा संसर्ग झाला आहे.

कतरिनाने सोशल मीडिया पोस्टद्वारे करोनाचा संसर्ग झाल्याचे सांगितले आहे. ‘माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या होम क्वारंटाइन आहे. मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया करोना चाचणी करुन घ्या’ असे तिने म्हटले आहे.

काल, ५ एप्रिल रोजी विकी कौशलने इन्स्टाग्राम अकाऊंट पोस्टद्वारे करोना झाल्याचे सांगितले. “संपूर्ण काळजी घेऊनही माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या होम क्वारंटाइन आहे. मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना मी विनंती करतो की त्यांनी स्वत:ची करोना चाचणी करून घ्या आणि काळजी घ्या,” अशा आशयाची पोस्ट विकीने केली होती.

दरम्यान, बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि गोविंदा यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. सोबतच काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री आलिया, रणबीर कपूर, आमिर खान, आर माधवन, विक्रांत मेसी, कार्तिक आर्यन, फातिमा सना शेख आणि गायक आदित्य नारायण या कलाकारांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2021 5:26 pm

Web Title: actress katrina kaif corona positive avb 95
Next Stories
1 Video: अन् अभिनेत्याने रागात हिसकावून घेतला चाहत्याच्या हातातील फोन
2 करोनावर मात केल्यानंतर कार्तिक आर्यनने खरेदी केली नवी कार, किंमत वाचून व्हाल थक्क
3 रविवारी ‘टॉकीज मनोरंजन लीग’ मध्ये कॉमेडीचा तडका
Just Now!
X