23 January 2020

News Flash

अभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्यांचा तुरुंगवास

पूनम सेठीने २०१३ मध्ये कोयना मित्राविरोधात तक्रार दाखल केली होती

तीन लाखांचा चेक बाऊन्स केल्या प्रकरणी अभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मॉडेल पूनम सेठीने अभिनेत्री कोयना मित्राविरोधात तक्रार केली होती. ज्या तक्रारीनंतर १ लाख ६४ हजारांच्या व्याजासह एकूण ४ लाख ६४ हजार रुपये देण्यात यावेत असे आदेशही दंडाधिकारी न्यायालयाने दिले आहेत. पूनम सेठीने २०१३ मध्ये कोयना मित्राविरोधात तक्रार दाखल केली होती. दरम्यान हे सगळे प्रकरण खोटे असून मला यात गोवले गेल्याचे कोयनाने म्हटले आहे.

कोयना मित्रा मला २२ लाखांचे देणे लागते, त्यापैकी तीन लाखांची रक्कम तिने मला चेकने परत केली होती. मात्र तो चेक बाऊन्स झाला. दरम्यान २२ लाख रुपये मला उधार देण्याएवढी पूनमची आर्थिक स्थिती नाही असे कोयना मित्राने म्हटले आहे. दरम्यान हे सगळे प्रकरण खोटे असून मला यामध्ये अकारण गोवले गेले आहे असे कोयना मित्राने म्हटले आहे.

सुनावणीच्या वेळी माझे वकील न्यायालयात हजर होऊ शकले नाहीत त्यामुळे माझी बाजू न्यायालयाने ऐकून घेतली नाही. माझी बाजू ऐकून न घेताच मला तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहे असेही कोयनाने म्हटले आहे.

 

First Published on July 22, 2019 1:12 pm

Web Title: actress koena mitra gets six months sentence in cheque bouncing case scj 81
Next Stories
1 …म्हणून सोशल मीडियावर व्हायरल झालाय #NotMyDeepika हा हॅशटॅग
2 ‘ती माझ्यासोबत नेपोटिझम कार्ड खेळू शकत नाही’, तापसीचं रंगोलीला उत्तर
3 युपी पोलिसांनी शेअर केला ‘मिशन मंगल’चा फोटो, अक्षयच्या सिनेमाबाबत केलं हे विधान
Just Now!
X