19 March 2019

News Flash

सोनमच्या ‘खोट्या हिंदुत्ववादा’च्या विधानावर भडकली ‘ही’ अभिनेत्री

कठुआ बलात्कार प्रकरणी देशभरातून संतप्त प्रतिक्रियांना उधाण आलेलं असतानाच कलाविश्वही त्यापासून दूर नाही.

सोनम कपूर

कठुआ बलात्कार प्रकरणी देशभरातून संतप्त प्रतिक्रियांना उधाण आलेलं असतानाच कलाविश्वही त्यापासून दूर नाही. विविध क्षेत्रातून या घटनेचा निषेध करण्यात आला. कलाविश्वही यात मागे राहिलं नाही. संपूर्ण बॉलिवूडही कठुआ बलात्कार प्रकरणातील पीडितेला न्याय मिळावा अशी मागणी करत आहे. सोनम कपूर, गुल पनाग, स्वरा भास्कर, करिना कपूर या सर्वच सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमतून यासंबंधीच्या पोस्ट केल्या.

‘आज आपल्या देशाचीही मान शरमेनं खालावली आहे’, असं म्हणत #justiceforourchild या हॅशटॅगअंतर्गत आठ वर्षांच्या चिमुरजीसोबत झालेल्या त्या घृणास्पद आणि दुर्दैवी घटनेविषयी हळहळ व्यक्त केली. सेलिब्रिटींनी उचललेलं हे पाऊल अनेकांना स्तुत्य वाटलं. तर काहींनी याविषयी खंत व्यक्त केली. अभिनेत्री कोयना मित्रा ही त्यापैकीच एक. खोट्या राष्ट्रप्रेमी आणि खोट्या हिंदुत्ववादाला अनुसरुन सोनमने तिच्या आणखी एका पोस्टमध्ये जे विधान केलं होतं, त्यावर कोयनाने नाराजी व्यक्त केली.

वाचा : बलात्कार करणाऱ्यांना जगण्याचा हक्क नाही; रेणुका शहाणे यांची जळजळीत पोस्ट

खोट्या हिंदुत्त्ववादाचा उल्लेख करुन सोनम या सर्व प्रकरणाला एक वेगळंच वळण देऊ पाहातेय, असं म्हणत कोयनाने एक ट्विट केलं. ‘एका घृणास्पद अपराधाचा तू निषेध केलास (जे स्तुत्य आहे.) पण, ‘खोटा हिंदुत्ववाद’ या शब्दाचा वापर करुन तू या प्रकरणाला वेगळं वळण देऊ पाहते आहेस. या एका बलात्कार प्रकरणी तू संपूर्ण धर्मालाच दोष कसा लावू शकतेस?’, असा प्रश्न तिने उपस्थित केला. हे ट्विट करत असताना कोयनाने बलात्काराच्याच काही इतर बातम्यांचाही आधार घेत यांच्या न्यायाचीसुद्धा मागणी करा, आवाज उठवा असंही म्हटलं.

First Published on April 17, 2018 1:31 pm

Web Title: actress koena mitra slams bollywood fashionista sonam kapoor for giving communal twist to kathua rape case