हॉलिवूड अभिनेत्री लॉरी लॉघलिन हिला महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियांमध्ये घोटाळा केल्याप्रकरणी दोन महिन्यांचा तुरुंगवास झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे प्रकरण कोर्टात सुरु होतं. अखेर या प्रकरणातील सर्व दोषींना कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. दरम्यान लॉरीने आपल्या चूकीसाठी कोर्टात माफी मागितली. “मी माझ्या मुलींच्या चांगल्या भविष्यासाठी हे कृत्य केलं. आता मला पश्चाताप होत आहे. केलेली चूक सुधारण्यासाठी मी कुठलीही शिक्षा भोगण्यास तयार आहे.” अशा शब्दात तिने कोर्टात माफी मागितली.

अवश्य पाहा – कुंडली न जुळल्यानं अभिनेत्रीने मोडलं लग्न

नेमकं प्रकरण काय आहे?

विल्यम सिंगर नावाच्या एका व्यक्तीने अमेरिकेतील नऊ विद्यापीठांत प्रवेश मिळवून देण्याचे तीन चोरटे मार्ग शोधले होते. बनावट नावाने विद्यार्थ्यांना त्याने प्रवेश परीक्षेस बसवले, विद्यार्थी गतिमंद आहेत असे सांगून उत्तरपत्रिका देण्यासाठी अधिक वेळ घेतला आणि तिसरा म्हणजे क्रीडा वर्गवारीतून विद्यार्थ्यांची गुणवत्ता आहे त्यापेक्षा किती तरी दाखवून त्यांना प्रवेश मिळवून दिले. हे अर्थातच पैशाच्या बदल्यात झाले. हे पैसे देणारे होते अमेरिकेतले तृतीयपर्णी तारेतारका, उद्योजक वा तत्सम. हा व्यवहार शेकडो कोटींचा झाला. या प्रकरणात लॉरी लॉघलिन आणि तिच्या पतीसह आणखी ५० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. अखेर योग्य पुराव्यांमुळे हे सर्व गुन्हेगार गजाआड गेले आहेत. दरम्यान लॉरीला दोन महिन्यांचा कारावास आणि दिड लाख अमेरिकी डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे.