News Flash

माहिरा खानने जाणूनबुजून मोडले विमानातील नियम

इतकंच नव्हे तर तिने इन्स्टा स्टोरीमध्ये तो व्हिडिओदेखील पोस्ट केला.

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान

सेलिब्रिटींच्या बारीकसारीक गोष्टींवर त्यांच्या चाहत्यांचं आणि प्रसारमाध्यमांचं बारकाईने लक्ष असतं. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या वागण्या-बोलण्याकडे अनेकांचे लक्ष असते. एखादी छोटी चूकही त्यांना महागात पडू शकते. यामुळे अनेकदा सेलिब्रिटी सोशल मीडियावर ट्रोलही होतात. मात्र, पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानला या सर्व गोष्टींची फारशी फिकीर नसल्याचे दिसते. नुकतेच तिने एका विमानप्रवासादरम्यान जाणुनबुजून नियमांचे उल्लंघन केल्याची चर्चा आहे.

आगामी ‘वरना’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती टीमसोबत कराचीहून लाहोरला जात होती. या विमानप्रवासादरम्यान माहिरा पुढील आसनाच्या ‘बल्क हेड’ (समोरील आसनाची मागची बाजू) वर पाय ठेवून बसलेली होती. या ठिकाणी पाय ठेवू नये, अशी स्पष्ट सूचना लिहली असतानाही माहिराने तसे केले. इतकंच नव्हे तर इन्स्टा स्टोरीमध्ये तिने एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती तिला पाय खाली घेण्यासाठी सांगत असताना माहिरा मिश्किलपणे हसताना पाहायला मिळतेय.

वाचा : होय, मी रिलेशनशीपमध्ये आहे आणि हा काही गुन्हा नाही- विराट

याआधी अभिनेता रणबीर कपूरसोबत व्हायरल झालेल्या फोटोंमुळे माहिरा चर्चेत आली होती. न्यूयॉर्कमध्ये माहिरा आणि रणबीर एकत्र वेळ व्यतीत करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या दोघांमध्येही काहीतरी नातं असल्याचे तर्क अनेकांनी लावले. त्यातही हे दोघंही धुम्रपान करताना दिसल्यामुळे अनेकांनी माहिराच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं होतं. तोकडा ड्रेस घातल्यामुळे आणि महिला असून धुम्रपान केल्यामुळे तिच्यावर सोशल मीडियावरुन टीकेची झोड उठवण्यात आली होती. या सर्व प्रकरणानंतर रणबीरने त्यांचं मत मांडत माहिराची पाठराखण केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2017 6:02 pm

Web Title: actress mahira khan deliberately breaks a rule on flight
Next Stories
1 ‘पद्मावती’चा वाद संपवण्यासाठी उमा भारतींनी सुचवला मार्ग
2 होय, मी रिलेशनशिपमध्ये आहे आणि हा काही गुन्हा नाही- विराट
3 PHOTOS : आलियाने अमृतासाठी लिहिलं खास पत्र!
Just Now!
X