‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री मयुरी देशमुखने तिच्या अभिनयाने आणि सौदर्यांने चाहत्यांची मनं जिकली आहेत. मयुरी सध्या स्टार प्लसवरील ‘इमली’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. या मालिकेत ती मालिनीची भूमिका साकारत असून तिच्या या भूमिकेलादेखील चाहत्यांची मोठी पसंती मिळतेय.

2020 हे वर्ष मयुरीसाठी खूप कठीण होतं. गेल्या वर्षी जुलै महिन्यात मयुरीच्या पतीने म्हणजेच अभिनेता म्हणजेच आशुतोष भाकरेने त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. नुकत्याच एक वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत मयुरीने तिच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ” 2020 वर्ष कठीण होतं. पण एका वेळेला मी ते पूर्ण वर्ष एका दिवसासारखं मानलं. कारण मी ज्या गोष्टींचा सामना करत होतो त्यातून बाहेर पडण्यासाठी असं करणं गरजेचं होतं.” असं ती म्हणाली.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत मयुरी म्हणाली होती, ” मी आजही त्याच्यावर प्रेम करते आणि आजही तो माझ्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहे. त्याच्या प्रेमासोबत मी एकटी राहू शकते. तो गेल्यानंतर मी काही मुलं दत्तक घेण्याचा विचार करतेय. मुलांसाठी दुसरं लग्न करण्याची काय आवश्यकता आहे?” असं ती म्हणाली होती.

या दु:खातून सावरत मयुरी परत एकदा खंबीरपणे उभी राहिली आहे. मयुरीनी लिहलेलं ‘डिअर आजो’ हे नाटक लवकरच विविध प्लॅटफॉर्मवर पाहण्याची संधी प्रेक्षकांना उपलब्ध होणार आहे. तीन वर्षांपूर्वी मयुरीने हे नाटक लिहलं होतं. या नाटकात भारतातील आजोबा आणि अमेरिकेत वाढलेली नात यांच्यातील नातेसंबधावर भाष्य करण्यात आलं आहे. लेखक मयुरी देशमुख हिचं पहिलंच नाटक. ऐन विशीत लिहिलेलं. तिच्या परिपक्व विचारांचं दर्शन या नाटकात घडवतं.

‘डिअर आजो’ नाटकाची कल्पना अशी सुचली

नाटकाची कल्पना अभिनयाचे धडे घेत असतानाच सुचल्याचं ती म्हणाली, “मी मुंबई विद्यापीठातून थिएटर आणि आर्टचं शिक्षण घेत होते. यावेळी मी यावेळी  आदरणीय शाफात खान यांच्या नाट्यलेखनाच्या कोर्समध्ये सामील झाले. ते उत्कृष्ट शिक्षक आहेत त्यामुळे मला लेखनाची आवड निर्माण झाली. आधी मला फक्त अभिनयाची आवड होती. यावेळीस मी दोन पात्र माझ्या मनात फिरत होती. यातूनच ‘आजो’ आणि ‘शानू’ ही  पात्र उदयाला आली. मी त्यांच्याभोवती कथा गुंफणं सुरु केलं. ते इतके विरोधाभासी होते की त्यांचा एकत्रित प्रवास मांडण्यात मला मजा येऊ लागली. माझ्या आभ्यासक्रमाचा भाग म्हणून लिहायला घेतलेली कथा अखेर ‘डिअर आजो’ च्या रुपात समोर आलीय.” असं ती म्हणाली.

डिअर आजो’ हे नाटक लवकरच डिश टीव्ही आणि D2H रंगमंचवर प्रेक्षकांना पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.