25 January 2021

News Flash

पतीच्या निधनानंतर पहिल्यांदाच व्हिडीओ शेअर करत मयूरी म्हणाली…

तिने व्हिडीओमध्ये तिच्या खास मैत्रीणाला शुभेच्छा दिल्या आहेत.

‘खुलता खळी खुलेना’ फेम अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा पती अभिनेता आशुतोष भाकरे याने काही महिन्यांपूर्वी आत्महत्या केली. नांदेडमधील राहत्या घरात आत्महत्या केल्याचं समोर आले. नैराश्येच्या समस्येचा सामना करत असल्याने त्यामधूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती नंतर समोर आली होती. आशुतोषच्या अचानक जाण्याने मयूरीला धक्का बसला होता. तिने आशुतोषच्या वाढदिवशी पोस्ट शेअर केली होती. पण आता मयूरीने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

नुकताच मयूरीने तिच्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने तिच्या खास मैत्रीणीला शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओमध्ये मयूरी पती आशुतोष विषयी बोलताना दिसत आहे. तिच्या या खास मैत्रीणीने तिला आशुतोषला नैराश्यामधून बाहेर काढण्यासाठी मदत केल्याचे तिने म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mayuri 🙂 (@mayurideshmukhofficialll) on

‘माझ्याकडून आणि आशुकडून श्वेता तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. आशुला शब्दात भावना व्यक्त करता येत नव्हत्या. त्यामुळे त्याने तुला कधीच सांगितलं नसेल की तू त्याच्या आयुष्यात असल्यामुळे तो किती आनंदी होता. खास करुन गेल्या एक वर्षापासून. तू माझी खास मैत्रीण असूनही त्याला किती समजून घेतले तेही अगदी सहजपणे आणि आमचा जो काही प्रवास होता नैराश्याला समजून घेण्याचा, त्याला कसं समोरे जाता येईल, हा सगळा आमचा प्रवास, हा आमचा संघर्ष तितकाच तुझाही होता’ असे मयूरीने म्हटले आहे. मयूरीने या व्हिडीओमध्ये तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

लॉकडाउनमुळे आशुतोष आणि मयुरी हे दोघे त्यांच्या नांदेडमधील घरीच राहत होते. २९ जुलै रोजी आशुतोषची आई आणि मयुरी गप्पा मारत असतानाच आशुतोष वरच्या खोलीमध्ये होता. बराच वेळ तो खाली न आल्याने घरातील सदस्य त्याला पाहण्यासाठी गेले असता त्याने गळफास लावून घेतल्याचे दिसून आले. आशुतोषच्या आत्महत्येमुळे त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. मात्र आता हळूहळू त्याचे कुटुंबिय यामधू सावरत आहेत.

मयुरीने २० जानेवारी २०१६ रोजी आशुतोष देशमुखबरोबर लग्न केलं. आशुतोषने ‘इच्यार ठरला पक्का’ आणि ‘भाकर’ या दोन चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘खुलता कळी खुलेना’मधून मयुरी घराघरात पोहचली. त्यानंतर तिने काही व्यावसायिक नाटकांमध्येही काम केलं. मयुरीने लिहिलेले-दिग्दर्शित केलेले ‘डिअर आजो’ रंगभूमीवर चांगलेच गाजले. लॉकडाउनचे निर्बंध लागण्याआधी मयुरी ‘बादशाह हम’ या नाटकात काम करत होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 11:54 am

Web Title: actress mayuri first video after husband ashutosh death avb 95
Next Stories
1 “लव्ह जिहाद बोलण्यापूर्वी स्पेशल मॅरेज अ‍ॅक्ट पाहा”; जिशान अय्युबच्या पत्नीचं ट्रोलर्सला प्रत्युत्तर
2 ‘आज बाळासाहेब असते, तर मुंबईत अशा घटना घडल्याच नसत्या’; मुकेश खन्नांनी शेअर केला व्हिडीओ
3 मॅट्रिमोनिअल वेबसाईटवरून झाली ओळख; जोडीदाराबद्दल व्यक्त झाली सई लोकूर
Just Now!
X